Sanju Samson Dainik Gomantak
देश

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Sanju Samson Batting: आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आशिया कप २०२५ च्या आधी संजू सॅमसनने शानदार अर्धशतकी खेळी करत आपला दावा मजबूत केला आहे.

Sameer Amunekar

आशिया कप २०२५ वर सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाच्या सलामीवीर स्थानासाठी अनेक खेळाडू प्रयत्न करत असताना, केरळचा स्टार क्रिकेटपटू संजू सॅमसन याने पुन्हा एकदा आपली दावेदारी ठळक केली आहे. आशिया कपच्या आधी झालेल्या सराव सामन्यात त्याने केलेली तुफानी फलंदाजी चर्चेचा विषय ठरली आहे.

१५ ऑगस्ट रोजी केरळमध्ये केसीए सेक्रेटरी इलेव्हन आणि केसीए प्रेसिडेंट इलेव्हन यांच्यात सराव सामना खेळला गेला. या सामन्यात केसीए सेक्रेटरी इलेव्हनचे नेतृत्व करताना सॅमसनने जबरदस्त खेळी केली. त्याने अवघ्या ३६ चेंडूत ५४ धावा फटकावल्या. आपल्या खेळीदरम्यान सॅमसनने ३ षटकार आणि २ चौकार लगावले. त्याच्या बॅटमधून आलेल्या या आक्रमक धावा प्रेक्षकांसाठीही डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या ठरल्या.

सॅमसनने अशा प्रकारे केलेल्या झंझावाती खेळीने निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. आशिया कप २०२५ जवळ येत असताना त्याची फॉर्म संघ व्यवस्थापनासाठी सकारात्मक संकेत देणारी आहे. संघाच्या पहिल्या क्रमांकासाठी तो शर्यतीत पुढे असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

गेल्या काही काळात सॅमसनला भारतीय संघात सातत्याने संधी मिळालेली नाही. पण स्थानिक क्रिकेटमधील त्याच्या सततच्या कामगिरीमुळे त्याचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. केरळच्या क्रिकेट चाहत्यांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला असून, सोशल मीडियावरही चाहत्यांनी त्याला आशिया कप संघात सामावून घेण्याची मागणी केली आहे.

भारतीय संघाच्या सलामीवीर स्थानासाठी शुभमन गिल, यशस्वी जैसवाल यांसारखी नावे आधीपासून चर्चेत आहेत. पण सॅमसनने केलेल्या या शानदार खेळीने त्याची दावेदारी अधिकच मजबूत केली आहे. आता निवड समिती त्याला आशिया कप २०२५ साठी हिरवा कंदील दाखवते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT