Sajana Marathi Movie Dainik Gomantak
देश

Sajana Movie Trailer: प्रेमाच्या छायेत दडलेलं अंधाराचं कटू सत्य... 'सजना' चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!!

Sajana Marathi Movie: 'सजना' चित्रपट, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे.

Manish Jadhav

'सजना' हा एक खास आगळावेगळा मराठी चित्रपट 27 जून 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रेमाच्या गंधाने सुरु झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सूड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे 'सजना' चित्रपट, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील मनोरंजनशी संबंधित विविध चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात आले.

दरम्यान, या ट्रेलरच्या माध्यमातून सजना चित्रपटाची (Movie) एक खास झलक समोर येते. सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट यात पाहायला मिळणार आहे. नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येणारे संघर्ष, मैत्रीचं प्रेमात रुपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सूड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे.

प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे. जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सारं काही संपलं आहे, तेव्हाच ही कथा एक अनपेक्षित वळण घेते जी प्रेक्षकांचे मन सुन्न केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.

'सजना' या चित्रपटाची निर्मिती शशिकांत धोत्रे यांनी केली असून कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनही धोत्रे यांचेच आहे. छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे. संगीत ओंकारस्वरुप यांचं असून सिनेमातील रोमान्टिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT