Fight After Watching Saiyaara Dainik Gomantak
देश

Viral Video: 'सैय्यारा' पाहून अंगात आला हिरो! प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी 'फाइट' मोड ऑन, थिएटरबाहेर दोन तरुणांमध्ये रंगलं प्रेमयुद्ध

Fight After Watching Saiyaara: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'सैय्यारा' चित्रपटाची क्रेझ आता सगळीकडेच पाहायला मिळत आहे.

Sameer Amunekar

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'सैय्यारा' चित्रपटाची क्रेझ आता सगळीकडेच पाहायला मिळत आहे. रिलीजनंतर अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने तब्बल १६५.४६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून विशेषतः तरुण प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची लोकप्रियता अफाट वाढली आहे.

या चित्रपटाच्या प्रभावामुळे काही प्रेक्षक थिएटरमध्ये बेशुध्द होण्याच्या घटनाही घडल्या आहेत, मात्र आता याच क्रेझमुळे ग्वाल्हेरमधील डीबी मॉलमधील थिएटरबाहेर घडलेला एक धक्कादायक प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रेयसीवरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील पडाव पोलीस ठाण्याच्या परिसरातल्या डीबी मॉलमध्ये दोन तरुण 'सैय्यारा' चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट पाहून बाहेर पडताच दोघांमध्ये त्यांच्या प्रेयसीच्या मुद्द्यावरून वाद उफाळून आला. वाद इतका टोकाला गेला की, दोघांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.

एका तरुणाने दुसऱ्याला जमिनीवर फेकले, तर तो दुसराच पुन्हा उभा राहून पहिल्याला ढकलून दिलं. थिएटरच्या बाहेर हे थरारक दृश्य पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली. काहींनी दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा राग शांत होईना.

घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर टाकला. काही तासांतच व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटिझन्सनी त्यावर मजेशीर आणि टीकात्मक कमेंट्स करायला सुरुवात केली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असला, तरी पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे पोलीस कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT