Safe Sex Education Dainik Gomantak
देश

"Safe Sex Education ही काळाची गरज..." अल्पवयीन बहिण-भावाच्या संबंधातून बाळाला जन्म; गुंतागुंतीच्या प्रकरणात हायकोर्टाचे सरकारसह समाजाला आवाहन

न्यायमूर्ती पी व्ही कुन्हीकृष्णन यांच्या एकल खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की अशा घटना सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी माहिती नसल्यामुळे घडतात.

Ashutosh Masgaunde

तरुणांमध्ये योग्य 'Safe Sex Education'च्या गरजेवर भर देत केरळ उच्च न्यायालयाने सरकारला एक समिती स्थापन करण्याचा आणि शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये त्याचा समावेश करण्याचा विचार करण्यास सुचवले. न्यायालयाने मुख्य सचिवांना याबाबत योग्य ती कारवाई करण्यास सांगितले.

आपल्या अल्पवयीन मुलाकडून गर्भवती झालेल्या आपल्याच अल्पवयीन मुलीची गर्भधारणा वैद्यकीयदृष्ट्या संपुष्टात आणण्याच्या वडिलांच्या याचिकेवर विचार करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

न्यायमूर्ती पी व्ही कुन्हीकृष्णन यांच्या एकल खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की अशा घटना सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी माहिती नसल्यामुळे घडतात.

या आघातातून बाहेर पडण्यासाठी या पालकांना जवळ ठेवणे हे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे. पालकांना कोणीही दोष देऊ शकत नाही. मात्र याला आपण समाज म्हणून जबाबदार आहोत. कौटुंबिक व्यवस्थेच्या संदर्भात भावंडातील व्यभिचार घडू शकतो. पण सुरक्षित लैंगित संबंधाबाबत माहिती नसल्यामुळेही असे होऊ शकते. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योग्य 'लैंगिक शिक्षण' किती आवश्यक आहे, याचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे.
न्यायमूर्ती पी व्ही कुन्हीकृष्णन, केरळ हायकोर्ट

जेव्हा हे प्रकरण प्रथम सुनावनीसाठी आले, तेव्हा न्यायालयाने 'सामाजिक आणि वैद्यकीय गुंतागुंत होण्याची शक्यता आहे' असे सांगून गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी दिली होती.

वैद्यकीय मंडळाने असे सादर केले होते की अल्पवयीन गर्भधारणेच्या 32 व्या आठवड्यांत असल्याने, प्रीमॅच्युअर बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे, ज्याला विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तरुण मनांना 'सुरक्षित सेक्स'बद्दल शिक्षित करण्याच्या गरजेवर भर देत न्यायालयाने म्हटले:

पालकांना अशा प्रकारांची लाज वाटू नये यासाठी सुरक्षित लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे. समाजात चांगले कौटुंबिक वातावरण असणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने अशा दुर्दैवी लोकांवर आरोप न करता एकत्र आले पाहिजे.
न्यायमूर्ती पी व्ही कुन्हीकृष्णन, केरळ हायकोर्ट

अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती नंतर न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या वडिलांना सांगितले की बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 च्या कलम 40 नुसार बाल कल्याण समितीकडे तिच्या पुनर्स्थापनेसाठी अर्ज सादर करण्यास तो मोकळा आहे.

शुक्रवारी जेव्हा हे प्रकरण विचारार्थ आले तेव्हा न्यायालयाला सांगण्यात आले की बाल कल्याण समिती, मलप्पुरमने अल्पवयीन आईला तिच्या मामाकडे सुपूर्द केले आहे. आणि नवजात मुलाला समितीकडे सुपूर्द केले आहे.

'नवजात बालकाचे संरक्षण हे राज्याचे कर्तव्य आहे', असे सांगून न्यायालयाने बालकल्याण समितीला कायद्यानुसार आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले.

भविष्यात आपल्या समाजात अशा प्रकारची घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आई-वडिलांची आणि पीडित मुलीच्या पेचाची कल्पनाही करता येत नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे, सुरक्षित लैंगिकतेबद्दल माहिती नसल्यामुळे हे घडले. अल्पवयीन मुले 'इंटरनेट' आणि 'गूगल सर्च'च्या पुढे असतात.
न्यायमूर्ती पी व्ही कुन्हीकृष्णन, केरळ हायकोर्ट

अॅड. कुलथूर जयसिंग यांनी यांनी एकल खंडपीठाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते की, कोणत्याही पुराव्याशिवाय पीडित मुलीच्या कुटुंबाचा सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा "खोटा अभिमान" वाचविण्यासाठी न्यायालयीन आदेशाद्वारे गर्भातील बाळाला संपुष्टात आणले जाऊ शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT