भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, 'जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती केवळ दहशतवाद आणि पीओकेवरच होईल. दोन्ही देशांमधील मुद्यावर कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. दोन्ही देश द्विपक्षीय पातळीवरच हा प्रश्न सोडवतील.' काश्मीर मुद्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर जयशंकर यांनी पुन्हा एकदा या मुद्यांवर भारताची भूमिका स्पष्ट केली.
दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हे सांगितले. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे की, दोन्ही देशातील संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय राहिले आहेत, यामध्ये आतापर्यंत अजिबात बदल झालेला नाही.
जयशंकर पुढे म्हणाले की, ''पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवादावरच होईल. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवले पाहिजे. आम्ही त्यांच्याशी दहशतवादावर (Terrorism) चर्चा करण्यास तयार आहोत. या वाटाघाटी शक्य आहेत. काश्मीरवर चर्चेसाठी एकमेव मुद्दा म्हणजे पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला प्रदेश भारताला परत करणे, आम्ही यासंबंधीच्या चर्चेसाठी तयार आहोत.''
परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, 'पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्ण परिस्थितीत आम्हाला खूप आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला. आमच्याकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव होता की गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे. 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांना जबाबदार धरण्यात आले.' पाकिस्तानसोबतच्या सिंधू जल वाटप कराराशी संबंधित एका प्रश्नावर जयशंकर म्हणाले की, ''सिंधू जल वाटप करार स्थगित आहे. जोपर्यंत पाकिस्तान (Pakistan) सीमापार दहशतवादाला रोख लावत नाही तोपर्यंत तो स्थगितच राहील.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.