Russian Groom And Ukraine Bride Married  Dainik Gomantak
देश

Russian तरुणाने युक्रेनियन तरुणीशी बांधली लग्नगाठ; हिंदू रितीरिवाजाप्रमाणे घेतले सात फेरे

Russia And Ukraine: हिंदू रितीरिवाजांनी हे प्रेमळ जोडपे साताजन्मासाठी एकमेकांचे झाले.

दैनिक गोमन्तक

Russian Groom And Ukraine Bride Married: रशिया आणि युक्रेन यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या युद्धादरम्यान धर्मशाला येथे मंगळवारी एका रशियन तरुणाने युक्रेनियन तरुणीशी लग्नगाठ बांधली. दोन्ही देशांतील तणावादरम्यान रशियन वर आणि युक्रेनियन वधूच्या लग्नाचे लोकांकडून खूप कौतुक केले जात आहे. हिंदू रितीरिवाजांनी हे प्रेमळ जोडपे साताजन्मासाठी एकमेकांचे झाले.

दरम्यान, अ‍ॅलोना ब्रामोका युक्रेनियन वधू सिर्गी नोविकाच्या घरी वरात घेऊन आला. पारंपारिक बँड-बाजाच्या तालावर नाचत वरासह मंडळी वधू पक्षाच्या घरी आली. त्याच वेळी, वधूच्या मैत्रिणींनी वराला आणि त्याच्या नातेवाईंकाना गेटवर शगुन देऊन मंडपाच्या ठिकाणी नेले. यानंतर स्थानिक पंडित रमण शर्मा (Pandit Raman Sharma) यांनी वैदिक मंत्रोच्चारासह विवाह मंत्राचे पठण केले. त्यानंतर या जोडप्याने नामजप करुन सात फेरे घेतले. यादरम्यान नारायण मंदिर दिव्य आश्रम खडोटा येथे नवविवाहित जोडप्याने आशीर्वाद घेतले.

दुसरीकडे, युक्रेनमधील (Ukraine) रहिवासी असलेल्या सिर्गी नोविका आणि अ‍ॅलोना ब्रामोका यांचा विवाह भारतीय हिंदू रितीरिवाजांनुसार झाला. सिर्गी आणि अ‍ॅलोना यांनी सांगितले की, 'आम्ही एकदा हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न होत असल्याचे पाहिले होते. हिंदू (Hindu) धर्माच्या परंपरा आणि मूल्यांचा आमच्यावर खूप प्रभाव आहे.'

पंडित रमण शर्मा यांनी सांगितले की, 'सिर्गी नोविका आणि अ‍ॅलोना ब्रामोका यांची सनातन परंपरेबद्दलची ओढ पाहून मी प्रभावित झालो. आज कालच्या धावपळीच्या युगात वधू-वर किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून सतत विचारले जाते की, या विधी पूर्ण करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल. त्याउलट, सिर्गी-अ‍ॅलोना आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकदाही घाई केली नाही. त्यांनी प्रत्येक विधी पूर्णवेळ घेऊन पार पाडला. सनातन पंरपरेबद्दलची त्यांची ओढ पाहून मला आश्चर्य वाटले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

SCROLL FOR NEXT