indian students studying medicine Dainik Gomantak
देश

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं पुढं काय?

विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित काही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार

दैनिक गोमन्तक

युद्ध आणि महामारीसारख्या परिस्थितीमुळे परदेशातून मायदेशी परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता जे पदवीधर विद्यार्थी परदेशात इंटर्नशिप पूर्ण करू शकले नाहीत ते उर्वरित प्रशिक्षण भारतात पूर्ण करू शकतील किंवा नवीन इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतील. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने शुक्रवारी ही माहिती दिली. यासंदर्भात सरकारमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित काही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

रशियन आक्रमणानंतर युक्रेनमधून (Ukraine) परतलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून खूप मदत मिळू शकते. अशा परिस्थितीत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्याच्या जवळपास शेवटच्या टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

विशेष म्हणजे युक्रेनमधील महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.

वृत्तानुसार, भारतीय महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांना मदत करण्याबाबत सरकार आणि एनएमसी यांच्यात चर्चा सुरू होती. या सुविधेसाठी, विद्यार्थ्यांनी परदेशी वैद्यकीय (Medical) पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासोबतच टेस्टही अनिवार्य असेल. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी या अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

अहवालानुसार, आयोगाचा (Commission) निर्णय किंवा एक्झिट परीक्षा अंमलात येईपर्यंत, NMC ने FMG च्या नोंदणीसाठी राज्य वैद्यकीय परिषदांना तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रक्रिया जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी विद्यापीठांतून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना FMGE, स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल. या अटी पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्याचा भारतीय वैद्यकीय पदवीधरांच्या बरोबरीने विचार केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT