युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान रशियाने भारताला S-400 ट्रायम्फ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवण्यास सुरुवात केली आहे. या घडामोडींची माहिती असलेल्या लोकांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मात्र, या हिस्स्यांची प्रणाली अद्याप भारताकडे (India) आलेली नाही. युक्रेन (Ukraine) संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून (Russia) भारताला प्रमुख लष्करी उपकरणे पुरवण्यात संभाव्य विलंब झाल्याबद्दल नवी दिल्लीतील वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा पुरवठा करण्यात आला आहे. (Russia has started supplying S-400 Triumph missile defense system to India)
दरम्यान, या घडामोडींशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, "रशियाने S-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या दुसऱ्या तुकडीच्या भागांचा पुरवठा सुरु केला आहे. मात्र मुख्य संरक्षण प्रणालीचा अद्याप पुरवठा करणे बाकी आहे.” पुरवठा केलेल्या भागांमध्ये 'सिम्युलेटर' समाविष्ट असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये रशियाने S-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या पहिल्या तुकडीचा पुरवठा सुरु झाला होता. ही क्षेपणास्त्र यंत्रणा देशात अशा प्रकारे तैनात करण्यात आली आहे की, ती उत्तरेकडील भागात चीनची सीमा आणि पाकिस्तानची सीमा व्यापते.
तसेच, दोन आठवड्यांपूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या भारत भेटीदरम्यान भारत-रशिया संरक्षण संबंधांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला S-400 क्षेपणास्त्र प्रणाली पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे रशियाने गेल्या महिन्यात म्हटले होते.
याशिवाय, रशियाचे राजदूत डॅनिश अलीपोव्ह म्हणाले, "जोपर्यंत S-400 कराराचा संबंध आहे, तो कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही याची खात्री बाळगा. याची 100 टक्के हमी आहे.” विशेष म्हणजे, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पाश्चात्य देशांनी गेल्या काही दिवसांपासून मॉस्कोवर कडक निर्बंध लादले आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये, S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच युनिट्स खरेदी करण्यासाठी भारताने रशियाशी $5 अब्ज डॉलरचा करार केला. तथापि, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रशासनाने भारताला इशारा दिला होता की, 'या कराराला पुढे घेऊन गेल्यास अमेरिकेच्या निर्बंधांना आमंत्रण मिळू शकते.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.