Rohit Sharma Post Dainik Gomantak
देश

Rohit Sharma Post: आशिया कपसाठी टीम जाहीर; क्रिकेटप्रेमी खूश, पण 'मुंबईचा राजा' टेन्शनमध्ये, स्टोरी टाकत म्हणाला, 'Stay Safe...'

Rohit Sharma Mumbai Rain Post: आशिया विश्वचषक 2025 साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या संघात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू बसणार याबाबत जोरदार चर्चा रंगत होती.

Sameer Amunekar

आशिया विश्वचषक 2025 साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या संघात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू बसणार याबाबत जोरदार चर्चा रंगत होती. अखेर निवड समितीने संघ जाहीर केला असून, क्रिकेटप्रेमींचं लक्ष या संघाकडे लागलं आहे.

मात्र, संघाच्या घोषणेइतकाच दुसरा एक मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्माचा सोशल मीडिया पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर “Stay Safe and Take Care” असा संदेश पोस्ट केला आहे. म्हणजेच, लोकांनी सुरक्षित राहावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन त्याने चाहत्यांना केलं आहे.

रोहित शर्माच्या या पोस्टमागचं कारण म्हणजे मुंबईत सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर लोकल रेल्वेचे काही मार्ग ठप्प झाले आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबईचा रहिवासी असलेला आणि मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील कॅप्टन राहिलेला रोहित शर्मा मुंबईप्रती विशेष जिव्हाळा बाळगतो. त्यामुळेच त्याने या कठीण परिस्थितीत मुंबईकरांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

एका बाजूला आशिया विश्वचषकासाठी टीम जाहीर झाल्याने क्रिकेट चाहत्यांध्ये उत्सुकता वाढली आहे, तर दुसऱ्या बाजूला रोहितच्या या भावनिक पोस्टमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित सिंह राणा आणि रिंकू सिंह.

राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, रियान पराग, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आत्मविश्वास उंचावेल,नात्यांमध्ये विश्वास वाढेल; 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

SCROLL FOR NEXT