Rohit Sharma Record Dainik Gomantak
देश

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल.

Sameer Amunekar

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माला एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल. खरं तर, रोहितला ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १०० षटकार मारणारा पहिला फलंदाज बनू शकतो. हे साध्य करण्यासाठी त्याला १२ षटकारांची आवश्यकता आहे.

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ षटकार

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ४६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८८ षटकार मारले आहेत. रोहितकडे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १०० षटकार मारणारा जगातील पहिला क्रिकेटपटू बनू शकतो. असे करण्यासाठी त्याला आणखी फक्त १२ षटकार मारण्याची आवश्यकता आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा हा विक्रम साध्य करू शकतो का हे पाहणे मनोरंजक असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, इऑन मॉर्गन दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॉर्गनने ५७ सामन्यात ४८ षटकार मारले आहेत. सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ७१ एकदिवसीय सामन्यात ३५ षटकार मारले होते.

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. धोनीने आतापर्यंत ५५ सामन्यात ३३ षटकार मारले आहेत. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलम पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने ४७ एकदिवसीय सामन्यात ३३ षटकार मारले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

  • रोहित शर्मा - ८८ षटकार (४६ वनडे)

  • इऑन मॉर्गन - ४८ षटकार (५७ वनडे)

  • सचिन तेंडुलकर - ३५ षटकार (७१ वनडे)

  • एमएस धोनी - 33 षटकार (55 वनडे)

  • ब्रेंडन मॅक्क्युलम - 33 षटकार (47 वनडे)

दोन्ही संघ

भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल

ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुनेमन, मार्नस लॅबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT