Joshi Math Uttarakhand  Dainik Gomantak
देश

Joshi Math Uttarakhand: तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोशीमठाला तडे; जमीन खचण्याचा धोका

या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी येथील सहाशे कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

Joshi Math Uttarakhand: या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी येथील सहाशे कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश दिले आहेत. जोशीमठ येथील एक प्रसिद्ध मंदिर शुक्रवारी कोसळले होते, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील घरांच्या भिंतींना देखील मोठे तडे गेले आहेत.

काही दिवसांपूर्वी गांधीनगर परिसरामध्ये हा प्रकार घडत होता. आता हळूहळू सुनील, मनोहर भाग, सिंगधर आणि मारवारी या भागांमध्ये काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे असे जोशीमठ महापालिकेचे माजी प्रमुख ऋषीप्रसाद सती यांनी सांगितले.

विष्णुपुरम वसाहत रिकामी

येथील विष्णुप्रयाग ऊर्जा प्रकल्पासाठी विष्णुपुरम ही आलिशान वसाहत उभारण्यात आली होती. येथील घरांना देखील तडे गेल्याने ती पूर्ण वसाहतच रिकामी करण्यात आल्याचे कंपनीचे अधिकारी कर्नल टी.एन.थापा यांनी सांगितले.

सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाले नाही असे त्यांनी नमूद केले. कंपनीने याच भागात उभारलेले अतिथिगृह आणि कँटीनलाही याचा मोठा फटका बसला.

घरांना बांबूचा आधार

घरांना तात्पुरता आधार देण्यासाठी लोक हे बांबूचा वापर करत आहेत असे जोशीमठ बचाव संघर्ष समितीचे समन्वयक अतुल सती यांनी सांगितले. उत्तराखंडच्या सीमेवरील सर्वांत शेवटचे शहर म्हणून जोशीमठला ओळखले जाते.

धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या हे स्थळ खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. भौगोलिकदृष्ट्या देखील हा परिसर खूप संवेदनशील समजला जातो. या ठिकाणी भूकंप झालातर मोठी हानी होईल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मानवी हस्तक्षेप आणि नैसर्गिक घटकांमुळे जोशीमठसारख्या ठिकाणाचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले. ही परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नसून मागील अनेक दिवसांपासून हे बदल होऊ लागल्याचे वाडिया इन्स्टिट्यूटचे संचालक कलाचंद सैन यांनी सांगितले.

मुळात जोशीमठचा पायाच खूप भुसभुशीत आहे. काही शतकांपूर्वी झालेल्या भूकंपाच्या ढिगाऱ्यावर हे शहर उभे राहिले आहे. भूगर्भीय बाबीचा विचार केला तर सगळा भाग ‘व्ही’ झोनच्या आकारामध्ये येतो.त्यामुळे या शहराला भूकंपाचा मोठा धोका आहे.

हवामान आणि हळूहळू पाणी जमिनीमध्ये झिरपू लागल्याने खडकांची क्षमता कमी होऊ लागते असे सैन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. जोशीमठचा पहिला उल्लेख हा 1886 सालच्या ॲटकिन्स यांच्या हिमालयाच्या गॅझेटियरमध्ये आढळतो.

मिश्रा समितीने 1976 च्या अहवालामध्ये त्याचा उल्लेख मिळतो. जोशीमठ हे ठिकाण नेमका किती भार सहन करू शकते? याचा फारसा विचार न करताच येथे बांधकामे केली जात आहेत, कदाचित हाच दाब येथील जमिनीला सहन न झाल्याने येथील घरांना तडे जात असावेत असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

बहुतांश ठिकाणी हॉटेलचे जाळे निर्माण झाले असून अतिक्रमणे देखील वाढली आहेत. अशा स्थितीत जमिनीवर ताण येतोच. आता अनेक ठिकाणांवर लोक हे घरांमध्ये राहू शकत नाहीत त्यामुळे त्यांना घर सोडावेच लागेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जोशीमठमधील स्थानिकांसाठी विशेष पॅकेज देण्यात यावे. लोकांप्रमाणेच येथील तीर्थस्थळांचे देखील अन्य ठिकाणांवर पुनर्वसन करावे लागेल. - स्वामी अविमुक्तेश्वरानंद, शंकराचार्य ज्योतिष पीठ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT