Bull Fight Accident Viral Video: उत्तराखंडमधील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ ऋषिकेशच्या रस्त्यावर क्षणात परिस्थिती कशी भयानक बनू शकते, याचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला. रस्त्यावरुन स्कूटी घेऊन जाणाऱ्या एका महिला चालकाला अचानक भीषण अपघाताचा सामना करावा लागला. रस्त्याच्या कडेला आपापसात भांडणाऱ्या दोन बैलांपैकी एक बैलाने अचानक रस्त्यावरुन जाणाऱ्या या स्कूटीला जोरदार धडक दिली. हा संपूर्ण थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून 'अंशुल' नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडिओच्या सुरुवातीला रस्त्याच्या एका बाजूला दोन शक्तिशाली बैल आपापसात अत्यंत हिंसकपणे लढताना दिसतात. दोघेही एकमेकांना शिंगांनी मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. रस्त्यावरील जागेच्या वर्चस्वावरुन त्यांच्यात जणू जोरदार युद्धच पेटले. दोन्ही बाजूने पूर्ण ताकद लावली जात होती आणि कोणताही बैल मागे हटायला तयार नव्हता. हे दृश्य पाहून रस्त्यावरुन जाणारा एक नागरिक हिंमत दाखवून पुढे आला आणि त्या बैलांना सोडवून शांत करण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु, त्याची ही मध्यस्थी भलतीच अंगाशी आली. त्या माणसाला पाहताच एक बैल अचानक मागे फिरला आणि थेट रस्ता ओलांडण्यासाठी सुस्साट धावला.
तो बैल काहीही न विचार करता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वेगाने पळाला. दुर्दैवाने, ठीक त्याचवेळी एक महिला आपली स्कूटी घेऊन तेथून जात होती. धावत्या बैलाची थेट त्या स्कूटीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, स्कूटी थेट रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका टॅक्सीला धडकली.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अनेक युजर्सने कमेंट्स करत त्या महिलेला गंभीर दुखापत तर झाली नाही ना, अशी विचारणा केली. तर दुसरीकडे, अनेकांनी या दुर्घटनेचा दाखला देत दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे किती अत्यंत गरजेचे आहे, याची पुनरुच्चार केला. कदाचित सेफ्टी हेल्मेटमुळेच अशा अचानक घडणाऱ्या अपघातात मोठा जीवघेणा धोका टळू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.