Rishabh Pant Viral Video: भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या मिश्किल आणि खोडकर स्वभावासाठी नेहमीच ओळखला जातो. विकेटच्या मागून तो नेहमी काहीतरी गंमतीशीर बोलत असतो, ज्यामुळे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात आणि याच अंदाजामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो.
सध्या ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानावर परतला असून तो भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय 'अ' संघ आणि दक्षिण आफ्रिका 'अ' संघ यांच्यात सामना सुरु आहे. इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाल्यामुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावर संधी मिळाली नव्हती. आता दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सामन्यादरम्यान ऋषभ पंतने गोलंदाजांना दिलेले निर्देश सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
एका गोलंदाजाला उद्देशून पंत म्हणाला, "अरे भाई, यही है यही है! 6 बॉल डाल के दिखाओ, मजा आएगा!"
या बोलण्याचा अर्थ असा असावा की, गोलंदाजाने एकाच टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करावा.
यापूर्वी, त्याने तनुष कोटियनलाही काही सूचना दिल्या होत्या. तो म्हणाला होता, "उधर ज्यादा फील्डर नहीं हैं ऑफ-साइड में गेंद डालते रहो। कोई बात नहीं। थोड़ी देर डंडे पर डालो। तंग मत हो, बिल्कुल रिलैक्स होकर डालो।"
पंतच्या अशा खुमासदार बोलण्यामुळे हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आणि चाहते त्याच्या पुनरागमनावर खुश झाले आहेत.
ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यावर जखमी झाल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये ट्रेनिंग करत होता. आता त्याने फिटनेस मिळवला असून, तो मैदानावर परतला आहे. दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धच्या सामन्यात जर त्याने चांगली कामगिरी केली, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. पंतने आतापर्यंत भारतासाठी 47 कसोटी सामन्यांमध्ये 3427 हून अधिक धावा केल्या आहेत.
सध्याच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका 'अ' संघाने चार विकेट गमावून 193 धावा केल्या आहेत. रुबिन हरमन आणि रिवाल्डो मूनसामी क्रीजवर आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी (South Africa) जोर्डन हरमनने सर्वाधिक 71 धावा आणि जुबैर हमझाने 66 धावांची खेळी केली. भारतीय 'अ' संघाकडून तनुष कोटियनने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या, तर अंशुल कम्बोज आणि गुरनूर बरार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.