Rishabh Pant Net Worth Dainik Gomantak
देश

Rishabh Pant: 100 कोटींचा 'मालक'! दिल्लीत 2 कोटींचे आलिशान घर, 4 शहरांत प्रॉपर्टी... ऋषभ पंतची Net Worth ऐकून चक्रावून जाल

HBD Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमनासाठी सज्ज आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमनासाठी सज्ज आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गंभीर अपघातामुळे तो मैदानाबाहेर होता, परंतु आता त्याने पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली असून क्रिकेटमध्ये परतण्यासाठी तो पूर्णपणे तयार असल्याचे समजते. पंतचा संघर्षमय प्रवास आणि त्याची आर्थिक उंची या दोन्ही गोष्टी तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत.

डावखुरा फलंदाज असलेला पंत सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींना तोंड देत क्रिकेट शिकला. दिल्लीतील मोती बाग गुरुद्वारात त्याने अनेक रात्री घालवल्या, जिथे त्याला क्रिकेटचे धडे मिळाले. साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या पंतने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारताच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी-२०) स्वतःची जागा पक्की केली. आज तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे.

पंतची एकूण संपत्ती १०० कोटींपेक्षा अधिक

मीडिया रिपोर्टनुसार, २०२५ मध्ये ऋषभ पंतची एकूण संपत्ती ₹१०० कोटी रुपयांहून अधिक आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, जाहिराती आणि गुंतवणुकीतूनही तो मोठे उत्पन्न कमावतो. पंत बीसीसीआयच्या A ग्रेड करारात आहे, ज्यातून त्याला दरवर्षी ₹५ कोटी मिळतात. याशिवाय, तो आयपीएल २०२५ मध्ये ₹२७ कोटी पगारावर खेळतो, ज्यामुळे तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

प्रत्येक कसोटी सामन्यासाठी पंत ₹१५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ₹६ लाख, आणि टी-२० सामन्यासाठी ₹३ लाख इतके मानधन घेतो. जाहिरातींमधून त्याचे वार्षिक उत्पन्न ₹१० ते ₹१५ कोटीं दरम्यान असल्याचे सांगितले जाते.

दिल्लीपासून रुरकीपर्यंत करोडोंची मालमत्ता

ऋषभ पंतकडे दिल्ली, हरिद्वार, डेहराडून आणि रुरकी येथे आलिशान घरे आहेत. त्याचे दिल्लीतले घर अंदाजे ₹२ कोटींचे असून, त्याशिवाय तो ऑडी A8 (₹1.32 कोटी), फोर्ड मस्टँग (₹2 कोटी) आणि मर्सिडीज-बेंझ GLE (₹2 कोटी) अशा महागड्या गाड्यांचा मालक आहे.

पिकलबॉल संघाचा सह-मालक

क्रिकेटव्यतिरिक्त पंतने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. अलीकडेच त्याने वर्ल्ड पिकलबॉल लीगमध्ये स्वतःचा संघ विकत घेतला आहे. स्विगीच्या सहकार्याने त्याने मुंबई पिकल पॉवर या संघाची मालकी मिळवली आहे. भारतात पिकलबॉल या खेळाची लोकप्रियता वाढत असून, पंतने या क्षेत्रात गुंतवणूक करून एक नवा मार्ग उघडला आहे.

धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ओळख

महेंद्रसिंग धोनीनंतर भारतीय संघाला यष्टीमागे विश्वासार्ह खेळाडू हवा होता, आणि पंतने ही भूमिका प्रभावीपणे निभावली आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजीने आणि तडफदार विकेटकीपिंगमुळे त्याने टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत त्याने परदेशी मैदानावरही आपला ठसा उमटवला आहे.

अनेक मोठ्या ब्रँड्सचा चेहरा

ऋषभ पंत अ‍ॅडिडास, जेएसडब्ल्यू, ड्रीम११, रियलमी, कॅडबरी, झोमॅटो अशा नामांकित ब्रँड्सशी संलग्न आहे. या जाहिरातींमुळेही त्याला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "अमित शहा, या भाजपचे ढोंग पाहा", काँग्रेसचा गृहमंत्र्यांना संदेश; 'म्हजे घर' योजनेवर प्रश्नचिन्ह

'प्रमोद सावंतांमध्ये रोखण्याची हिम्मत नाही', जमिनीचा मालकी हक्क देण्याचा केजरीवालांनी 'मये'वासीयांना केला वायदा

Goa Crime: सुर्ला येथे फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

Rohit Sharma Captaincy: "आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायचीय", रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

'अमित पाटकरांची खाण प्रमोद सावंतांच्या आशिर्वादाने सुरुये, दोघेही गोमंतकीयांना मूर्ख बनवतायेत'; अरविंद केजरीवाल

SCROLL FOR NEXT