Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: जीवघेणा स्टंट व्हायरल..! एकाच स्कूटीवर 5 तरुण, पाचव्याला पठ्ठ्यांनी बसवलं खांद्यावर; व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

Viral Stunt Video: सध्या असाच एका जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे, ज्याने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे.

Manish Jadhav

Viral Stunt Video: सोशल मीडियाने आज देशातील प्रत्येक नागरिकाला एकमेकांशी जोडले आहे. यामुळे एका ठिकाणी घडलेली कोणतीही अतरंगी किंवा अनोखी घटना तडक व्हायरल होते आणि जगाला पाहायला मिळते.

सध्या असाच एक जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला, ज्याने नेटकऱ्यांना चकित केले. स्कूटी, बाईक किंवा कारचा वापर करुन रील (Reel) बनवण्यासाठी खतरनाक स्टंट करण्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. काही लोक केवळ गंमत म्हणूनही असे धोकादायक कृत्य करतात. मात्र, छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका स्कूटीवर पाच तरुणांनी केलेला स्टंट पाहून तुमचेही डोळे विस्फारतील.

आधी हा व्हिडिओ पाहा!

खांद्यावर बसवून केला जीवघेणा स्टंट

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Video) दिसते की, एक तरुण स्कूटी चालवत आहे. त्याच्या पाठीमागे आधीच तीन तरुण बसलेले आहेत, म्हणजेच एकूण चार लोक एकाच स्कूटीवर आहेत. पण पाचव्या तरुणाला ॲडजस्ट करण्यासाठी त्यांनी जी पद्धत वापरली, ती जीवघेणी आणि अत्यंत धोकादायक आहे. पाचवा तरुण स्कूटीवर बसलेल्या तिघांच्या खांद्यावर लटकलेला किंवा बसलेला दिसत आहे. चालकासह 5 लोक अत्यंत धोकादायक पद्धतीने एकाच स्कूटीवर प्रवास करत आहेत. हे दृश्य पाहून एका जागरुक नागरिकाने याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ तूफान व्हायरल

@Ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 'छत्तीसगडमधील 5 तरुणांना विचित्र बाईक स्टंट करताना कॅमेऱ्यात पकडण्यात आले,' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला असून त्यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, ज्यात विनोद आणि टीका दोन्हीचा समावेश आहे.

  • एका यूजरने गमतीने लिहिले की, "भारत नवशिक्यांसाठी (Beginners) नाहीये."

  • दुसऱ्या यूजरने 'बिलासपूरचे तर नाही ना?' असा प्रश्न विचारत ठिकाणाची चौकशी केली.

  • एका यूजरने या स्टंटच्या धोक्यावर भाष्य करताना लिहिले की, "महिला पुरुषांपेक्षा जास्त का जगतात, याचे हे कारण आहे."

  • तर एका स्थानिक यूजरने "छत्तीसगडच्या वतीने मी माफी मागतो," अशी प्रतिक्रिया दिली.

  • काही नेटकर्‍यांनी वाहतूक पोलिसांना टॅग करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

सुरक्षेचे नियम पाळणे महत्त्वाचे

अशा प्रकारचे स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असले तरी, ते इतरांसाठी धोकादायक उदाहरण ठरतात. यामुळे स्टंट करणाऱ्या तरुणांच्या जीवाला तर धोका असतोच, पण रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होतो. रिस्क आणि व्ह्यूज (Views) साठी जीव धोक्यात घालणे चुकीचे आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि असुरक्षित कृत्ये टाळावीत, असे आवाहन वारंवार केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tilak Verma: 'तो भारताचा कर्णधार होणार...' सुनील गावस्करांनी तिलक वर्माबाबत केली मोठी भविष्यवाणी Watch Video

The Taj Story Controversy: ताजमहालमध्ये शिवमंदिर? परेश रावल यांच्या ‘द ताज स्टोरी’वरुन वादाची ठिणगी, पोस्ट करत म्हणाले...

Tilak Varma: "पाकिस्तान आमच्यासमोर टिकू शकत नाही..." आशिया कप फायनलचा हिरो तिलक वर्माची पाकिस्तानवर थेट टीका

Viral Post: रिटायरमेंटनंतर गोव्यात आलेला NRI लगेच परतला; म्हणाला,"दारूशिवाय इथे कुठलीच संस्कृती नाही!"

Amit Shah In Goa: गृहमंत्री अमित शहा शनिवारी गोव्यात; 'माझे घर' योजनेचा होणार शुभारंभ

SCROLL FOR NEXT