Republic Day 2025 Dainik Gomantak
देश

Republic Day 2025: कर्तव्यपथावर भारताची शक्ती, सांस्कृतिक विविधतेचं दर्शन; देशभरात उत्साहाचं वातावरण

Republic Day: भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे.

Sameer Amunekar

Republic Day

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. दिल्लीत कर्तव्यपथावरील परेडमधून देशाच्या विविधतेमधील एकता, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि सैन्यदलाचं सामर्थ्य याचं भव्य प्रदर्शन जगाला पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "आज आपण प्रजासत्ताकाचे गौरवशाली वर्ष साजरी करत आहोत. आपल्या संविधानाचे आदर्श जपण्यासाठी आणि मजबूत तसेच समृद्ध भारतासाठी काम करण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळकटी मिळो."

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर लष्करी संचलन सुरू आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे १६ चित्ररथ पाहायला मिळत आहे.

'सारे जहाँ से अच्छा' गाण्यानं सुरुवात

७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात 'सारे जहाँ से अच्छा' या गाण्यानं झाली. एका महिला कलाकाराच्या नेतृत्वाखाली देशभरातील ३०० कलाकारांनी पारंपारिक वाद्यांवर 'सारे जहाँ से अच्छा' ही धून वाजवली आणि प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सुरुवात केली.

गोव्याचा चित्ररथ

गोव्याचा चित्ररथ 'स्वर्णिम भारत: विरासत और विकास' या थीमवर आधारित होता. चित्ररथामध्ये गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे आणि समृद्ध संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळालं.

क्षेपणास्त्रांची झलक

७६ व्या प्रजासत्ताक दिनी, दिल्लीतील कर्तव्यपथावर नवीन क्षेपणास्त्रे आणि लष्करी शस्त्रांची झलक पाहायला मिळाली. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, पिनाका मल्टी-लाँचर रॉकेट सिस्टीम, बीएम-२१ अग्निबान, १२२ मिमी मल्टीपल बॅरल रॉकेट लाँचर, आकाश शस्त्र प्रणाली प्रदर्शित करण्यात आली.

इंडोनेशियाच्या मिलिटरी अकादमीचे मार्चिंग पथक

दिल्लीतील कर्तव्यपथावर परेडमध्ये इंडोनेशियाचा १६० सदस्यांचा मार्चिंग दल आणि १९० सदस्यांचा बँड दल दिसून आला. इंडोनेशियन मिलिटरी अकादमी (अकमिल) चा १९० सदस्यांचा ग्रुप बँड, जेंडरंग सुलिंग कानकुन लोकानंता आणि इंडोनेशियन नॅशनल आर्म्ड फोर्सेस (टीएनआय) च्या सर्व शाखांमधील १५२ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला मार्चिंग दल देखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील झाला.

परेड कमांडरची राष्ट्रपतींना सलामी

प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परेड कमांडर लेफ्टनंट जनरल भवनिश कुमार आणि परेड सेकंड-इन-कमांड मेजर जनरल सुमित मेहता यांच्याकडून सलामी घेतली.

दिल्ली आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ

दिल्लीतील कर्तव्यपथ येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील चित्ररथ प्रदर्शित करण्यात आली. दिल्लीचा चित्ररथ भारतातील लोकांच्या सामूहिक आकांक्षांचे प्रतीक आहे. तर पश्चिम बंगालचा हा चित्ररथ राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा, कलात्मक परंपरांचे दर्शन घडवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT