Republic Day 2023 Live Updates: Dainik Gomantak
देश

Republic Day 2023 Highlights: प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर सैन्यशक्ती अन् संस्कृतींचा अनोखा नजराणा

दैनिक गोमन्तक

परेड संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कर्तव्यपथावर हस्तांदोलन केले

प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर पंतप्रधान मोदी कर्तव्यपथावर चालताना दिसले. त्यांनी हस्तांदोलन करून लोकांना अभिवादन केले.

राष्ट्रपती द्रौपदीसह प्रमुख पाहुणे अब्दुल फताह अल सिसी कर्तव्यपथावरुन रवाना 

राष्ट्रगीताने परेडची सांगता करण्यात आली. प्रमुख पाहुणे अब्दुल फताह अल सिसी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह रायसीना हिल्सकडे राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या

कर्तव्यपथावर हवाई कसरतींचा अनोखा नजराणा 

कर्तव्यपथावर हवाई कसरतींचा अनोखा नजराणा पाहायला मिळाला आहे. ५७ प्रकारच्या विविध कसरती पाहायला मिळाल्या आहेत. यात महिलांचा समावेश आहे.

कर्तव्यपथावर डेअर डेव्हिल्सचा चित्तथरारक कसरती

काळजाचा थोका चुकवणरे कवायती

कर्तव्यपथावर नारी शक्तीचा जागर

कर्तव्यपथावर नारी शक्तीचा जागर पाहायला मिळाला आहे.

कर्तव्यपथावर देशभरातील नृत्यकलेचा नयनरम्य मिलाफ

राजपथावर विविध संस्कृती आणि सामर्थ्याचे दर्शन पाहायला मिळाले आहे.तसेच संस्कृती, संगीत आणि नृत्याचा कलाविष्कार पाहायला मिळाला आहे.

कर्तव्यपथावर देशाच्या संस्कृतीची झलक

कर्तव्यपथावर नेत्रदिप संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळाले आहे.

एनसीबी गुह मंत्रालयाचा चित्ररथ

या चित्ररथामध्ये नशामुक्त भारताचा देखावा पाहायला मिळत आहे.

Ministry of Home Affairs'

उत्तर प्रदेशचा चित्ररथ

या चित्ररथामध्ये अयोध्येचा दिपत्सवचे नयनरम्य दर्शन दाखवले आहे.

Uttar Pradesh's

दादार नगर हवेली, दिव दमण परंपरा दाखवणारा देखावा

दादार नगर हवेली, दिव दमण परंपरा दाखवणारा देखावा

हरियाणा 

चित्ररथात कुरुक्षेत्रातील गीता महोत्सव दाखवण्यात आला आहे.

कर्नाटक

या चित्ररथामध्ये नारी शक्तीचा उत्सव पाहायला मिळाला आहे

तामिळनाडूचा चित्ररथ संस्कृतीवर आधारित

महिला सशक्तीकरण आणि संस्कृतीवर आधारित होता.

tamilnadu

महाराष्ट्राचा चित्ररथ 

नारीशक्तीचा जागर दाखवण्यात आला. साडेतीन शक्तीपीठीचे दर्शन पाहायला मिळाले.

Maharashtra

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालचा चित्ररथ दुर्गा पुजेवर आधारित होता

west bangal

केरळाचा चित्ररथ

केरळाचा चित्ररथ महिला सशक्तीकरणावर आधीरित होता

kerala

जम्मु-काश्मिरचा  तीर्थक्षेत्र आणि पर्यटनावर आधारित

जम्मु-काश्मीरचा चित्ररथ पर्यटनावर आधारित होता.

अरुणाचल प्रदेशचा चित्ररथ

अरुणाचल प्रदेशचा चित्ररथ हा पर्यटनाला चालना देणार आहे.

झारखंडचा सुंदर चित्ररथ

झारखंडच्या तित्ररथाने बाबा वैद्यनाथचा देखावा साकारला होता

गुजरातचा चित्ररथ 

गुजरातचा चित्ररथ अनोखा होता.

त्रिपुराचा चित्ररथ पर्यटनावर आधीरित

त्रिपुराचा चित्ररथ पर्यटनावर आधारित

उत्तराखंडचा तित्ररथ मानसखंडावर आधारित

उत्तराखंडचा चित्ररथ मानसखंडावर आधारित

लडाखच्या संस्कृतीचे  दर्शन

लडाखच्या संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळाले आहे.

आसामचा चित्ररथ सेनानी शौर्य़ाचे पैलतीर

आसामच्या चित्ररथाचे नयनरम्य दृश्य कर्तव्यपथावर पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेशचा अनोखा चित्ररथ

आध्र प्रदेशचा अनोखा चित्ररथ

अग्निवीरांचा पहिल्यादांच सहभाग

लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांच्या नेतृत्वाखालील 144 तरुण खलाशांच्या नौदल तुकडीने कर्तव्यपथावर पथसंचलन केले. इतिहासात प्रथमच पथसंचलन करणाऱ्या तुकडीत 3 महिला आणि 6 पुरुष अग्निवीरांचा समावेश आहे

कर्तव्य पथावर यंदा 'Made In India' चे दर्शन

कर्तव्य पथावर यंदा 'Made In India' चे दर्शन पाहायला मिळाले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देण्यात आली

कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देण्यात आली आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी प्रमुख पाहुणे म्हणून समारंभात उपस्थित आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्यपथावर दाखल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्यपथावर दाखल झाल्या आहेत. तसेच समारंभाचे प्रमुख पाहुणे अब्देल फताह अल-सिसी यांचे स्वागत पंतप्रधान यांनी केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्यपथारडे रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्यपथारडे रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत समारंभाचे प्रमुख पाहुणे अब्देल फताह अल-सिसी आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच अग्निवीर सहभागी होणार

देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहा अग्निवीर देखील नौदलाच्या मार्चिंग तुकडीचा भाग असतील, जे देशभक्तीच्या उत्साहाने गुरुवारी कर्तव्याच्या मार्गावर औपचारिक परेडमध्ये सामील होतील.

पंतप्रधान मोदींनी शहिदांना वाहिली श्रध्दांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहिदांना वाहिली श्रध्दांजली आहे. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण कर्मचारी उपस्थित होते. 

राजपथावर दिसणार महाराष्ट्राचं चित्ररथ

राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील 'साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर' याचे दर्शन होणार आहे.

नागपुरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपुरमध्ये उपउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

श्रीनगरमध्ये क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकवण्यात आला

श्रीनगरमधील लाल चौकातील क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकवण्यात आला आहे.

पंजाबच्या अटारी सीमेवर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला; पहा व्हिडीओ

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडून येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकवला.

Republic Day 2023

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी तिरंगा फडकवला

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिरंगा फडकवला

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमण सिंह यांनी पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमण सिंह यांनी पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, राष्ट्रीय सरचिटणीस (संघ) बीएल संतोष आणि इतर नेतेही उपस्थित होते.

इस्रायलकडून भारताला व्हिडिओ शेअर करत खास अंदाजात शुभेच्छा

इस्त्रायलकडून भारताला खास अंदाजात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ओडिशाचे राज्यपाल प्रा. गणेशी लाल यांनी राष्ट्रध्वज फडकावला

ओडिशाचे राज्यपाल प्रा. गणेशी लाल यांनी भुवनेश्वरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडला राष्ट्रध्वज फडकावला आणि सलामी घेतली. मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देखील उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन

वर्षा निवासस्थानावर एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहन केले आहे.

CM Eknath Shinde

74th Republic Day Parade Video: चेन्नई येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड

तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी चेन्नई येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सलामी घेतली

तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी तिरंगा फडकवला

चेन्नई येथे प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीत तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी तिरंगा फडकवला

तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी तिरंगा फडकवला

तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी हैदराबाद येथे राष्ट्रध्वज फडकवला

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तिरंगा फडकवला

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरच्या सीएम हाऊसमध्ये तिरंगा फडकवला आहे. याचे फोटो एएनआयने शेअर केले आहे.

21 तोफांची सलामी

परंपरेनुसार प्रथम राष्ट्रध्वज फडकावला जाईल, त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. 21 तोफांच्या सलामीसोबत 105 मिमीच्या भारतीय फील्ड गनही असतील. ते व्हिंटेज 25 पाउंडर गनची जागा घेईल,जी संरक्षणातील वाढत्या 'आत्मनिर्भरते'ला प्रतिबिंबित करेल. 105 हेलिकॉप्टर युनिटचे चार Mi-17 1V/V5 हेलिकॉप्टर कर्तव्य पथावर उपस्थित प्रेक्षकांवर पुष्पवृष्टी करतील.

सकाळी 10:30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9:51 वाजता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सॅल्युटिंग डायसवर स्वागत करतील. सकाळी 10:30 वाजता राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यानंतर कर्तव्य पथवर परेड सुरू होईल.

आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा केला जाणार आहे. दिल्लीच्या कर्तव्य पथावर आज प्रजासत्ताक दिनाची परेड खूप खास असणार आहे. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी हे यावर्षी प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. 120 सदस्यीय इजिप्शियन तुकडी देखील कर्तव्या मार्गावरील उत्सवादरम्यान संचालन करताना पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनात जास्तीत जास्त लोकसहभाग वाढावा यादृष्टीने आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, कर्तव्यपथाचे देखभाल करणारे कामगार, भाजी विक्रेते, दूध बुथ कामगार, किराणा दुकानदार आणि रिक्षाचालक हे "विशेष निमंत्रित" आहेत. अधिकाऱ्यांनी सादरीकरणादरम्यान याची माहिती दिली. गेल्या वर्षी राजपथचे नामकरण 'कर्तव्य पथ' करण्यात आल्यानंतर हा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT