RCB IPL 2025 win tragedy Dainik Gomantak
देश

RCB Fan Death: फक्त ट्रॉफी नाही, दुःखही घेऊन आला! RCB च्या विजयाने एका कट्टर चाहत्याचा जीव घेतला

RCB Fan Dies After IPL 2025 Victory: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विजयाचा जल्लोष कर्नाटकातील एका निष्ठावान चाहत्याच्या जीवावर बेतला

Akshata Chhatre

मुधोळ: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विजयाचा जल्लोष कर्नाटकातील एका निष्ठावान चाहत्याच्या जीवावर बेतला. मुधोळ तालुक्यातील अवराडी गावात मंगळवारी (दि.३) रात्री मंजुनाथ इरप्पा कंबार (वय २८) या तरुणाचा आरसीबीच्या विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने अवराडी गावावर शोककळा पसरली असून, एका उत्साही आणि तरुण क्रिकेटप्रेमीच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

आरसीबीच्या 'आनंदाचा अतिरेक' जीवावर

मंजुनाथ इरप्पा कंबार हा आरसीबीचा कट्टर समर्थक होता. आपल्या लाडक्या संघाला आयपीएल ट्रॉफी उचलताना पाहून तो आनंदाने वेडा झाला होता. गावातील संगोल्ली रायण्णा सर्कलजवळ मित्रांसोबत आरसीबीच्या विजयाचा जल्लोष करताना, नाचत असतानाच तो अचानक कोसळला. त्याला तात्काळ जवळच्या महालिंगापूर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मंजुनाथ हा एक क्रिकेटप्रेमी होता. आरसीबीच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी त्याने कोणतीही कसर सोडली नव्हती. त्याने सार्वजनिकपणे सामना पाहण्यासाठी मोठी एलईडी स्क्रीन लावली होती आणि गेल्या चार दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी करत होता.

सर्व काही व्यवस्थित असावे यासाठी त्याने जेवण आणि झोपही सोडली होती, असे सांगितले जात आहे. उत्सवासाठी त्याने फटाके आणि रंगाचीही व्यवस्था केली होती.

'अवराडी वॉरियर्स'चा संस्थापक, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मंजुनाथ हा 'अवराडी वॉरियर्स' नावाच्या स्थानिक क्रिकेट संघाचा संस्थापक होता आणि तो गावातील स्पर्धांमध्ये सक्रियपणे भाग घेत असे. त्याच्या लाडक्या संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याने त्याला आनंदाचा इतका आवेग आला की, त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला.

मंजुनाथच्या पश्चात त्याची गर्भवती पत्नी आणि सहा महिन्यांची लहान मुलगी आहे. त्याचे वडील इरप्पा हे शेतकरी आहेत. या तरुण आणि आशादायक आयुष्याचा असा अचानक अंत झाल्याने कुटुंबियांवर आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवराडी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने आयपीएलच्या विजयाचा आनंदही शोकात बदलला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT