Ashwin and Ben Stokes  Dainik Gomantak
देश

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Injured Player Rule Cricket: सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळवण्याची परवानगी देण्याबाबतचा हा वाद होता.

Manish Jadhav

Injured Player Rule Cricket: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशा बरोबरीत संपली. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला गेलेला शेवटचा सामना भारताने 6 धावांनी जिंकून ही मालिका बरोबरीत सोडवली. या संपूर्ण मालिकेत दोन्ही संघांमध्ये मैदानावर अनेक वाद झाले, पण त्यापैकी एक वादाची सर्वाधिक चर्चा झाली. सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळवण्याची परवानगी देण्याबाबतचा हा वाद होता. यावर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने विचित्र प्रतिक्रिया दिली होती, ज्याला आता भारताचा अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) जोरदार प्रत्युत्तर दिले.

अश्विनचे स्टोक्सला जोरदार प्रत्युत्तर

मँचेस्टर कसोटीत भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) फलंदाजी करताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. स्कॅन केल्यानंतर त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले, तरीही तो रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर पुन्हा फलंदाजीला आला. याच घटनेनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी जखमी खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला मैदानात उतरवण्याची परवानगी देण्याबाबत चर्चा केली होती.

यावर जेव्हा बेन स्टोक्सला विचारण्यात आले, तेव्हा त्याने 'मस्करी' करत टाळले. त्याने याला एक 'मजेदार कल्पना' म्हणून हसण्यावारी नेले. आता अश्विनने स्टोक्सच्या याच वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला की, "तामिळमध्ये एक म्हण आहे, ज्याचा अर्थ सरळ आहे, तुम्ही जे पेराल, तेच उगवेल. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ लगेच मिळते."

अश्विन पुढे म्हणाला, "जेव्हा स्टोक्सला जखमी खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला घेण्याबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने ही गोष्ट खूप हलक्यात घेतली. मी स्टोक्सच्या खेळाचा खूप मोठा चाहता आहे, पण त्याला या प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक द्यायला हवे होते. तुम्ही तुमच्या विचारांसाठी स्वतंत्र आहात, पण तुम्ही अशा विचारांना 'मस्करी' किंवा हास्यास्पद म्हणून टाळू शकत नाही."

अश्विनने दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे, मैदानाबाहेर सुरु असलेल्या या शाब्दिक चकमकीत एक नवा ट्विस्ट आला आहे. स्टोक्सने केलेल्या टिप्पणीवर अश्विनने दिलेले हे उत्तर आता चर्चेचा विषय बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

West Nile Virus: वेस्ट नाईल व्हायरसने जगभरात वाढवली चिंता! लहान मुलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

SCROLL FOR NEXT