Ratan Tata Dainik Gomantak
देश

RATAN TATA Passess Away: उद्योग 'रतन' हरपले; देशाने दयाळू, विलक्षण माणूस गमावला, PM मोदींनी व्यक्त केला शोक

Ratan Tata RIP: जगातील उद्योग क्षेत्रात भारताचा झेंडा रोवणारे उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईत निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Manish Jadhav

मुंबई : जगातील उद्योग क्षेत्रात भारताचा झेंडा रोवणारे उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईत निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांची टीम सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. अखेर बुधवारी रात्री त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. टाटा सन्सने पत्रकाद्वारे रतन टाटा यांच्या निधन झाल्याची माहिती दिली.

रतन टाटांचा जन्म Ratan Tata Birthdate

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं.

साधेपणा

रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जात होते. उदारीकरणाच्या कालखंडानंतर टाटा समूह आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांचे मोठे योगदान होते.

रतन टाटांचं शिक्षण Ratan Tata Education

रतन टाटा यांचे शालेय शिक्षण मुंबईतून झाले. यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये बीएस केले. रतन टाटा 1961-62 मध्ये टाटा समूहात सामील झाले. यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राममधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले.

टाटा समूहाची जबाबदारी

1991 मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. 2012 मध्ये सेवानिवृत्त झाले. भारतात प्रथमच संपूर्णपणे तयार केलेल्या कारचे उत्पादन सुरु करण्याचे श्रेयही त्यांना जाते. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या पहिल्या कारचे नाव 'टाटा इंडिका' होते. जगातील सर्वात स्वस्त कार 'टाटा नॅनो' बनवण्याचे श्रेयही त्यांना जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने लँड रोव्हर आणि जग्वार खरेदी करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून दिली होती.

भारतीय 'रत्ना'चा सन्मान

रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं काय म्हणाले? PM Narendra Modi On Ratan Tata

रतन टाटा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवरुन ट्विट करत शोक व्यक्त केला. मी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही रतन टाटा यांच्याशी भेटीगाठी व्हायच्या अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

रतन टाटा हे एक दूरदर्शी उद्योगपती होते. त्यांनी बोर्डरुमच्या पलीकडेही योगदान दिले असून नम्रता, दयाळूपणा आणि समाजाचे भले करण्यासाठी त्यांनी स्वतःला अनेक लोकांशी जोडले होते, अशा शब्दांत मोदींनी श्रद्धांजली वाहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT