Rashtrapati Bhavan

 

Dainik Gomantak

देश

1 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन राहणार बंद

राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) आणि राष्ट्रपती भवन संग्रहालयाला भेट देणे 1 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी बंद केले जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले आहे. "राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) आणि राष्ट्रपती भवन संग्रहालयाला भेट देणे 1 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी बंद केले जाणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत गार्ड ऑफ चेंज सोहळा देखील होणार नाही," असे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ओमिक्रॉन वाढता प्रसार

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना राष्ट्रपती भवनाने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी भारतातील ओमिक्रॉन (omicron variant) रुग्णांची संख्येने 1,000 चा टप्पा ओलांडला आहे. कोरोना विषाणूचा हा अत्यंत घातक संसर्गजन्य व्हेरिएंट असल्याने देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत

आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) म्हटले, आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ओमिक्रॉनबाधित 1,270 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 374 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे आहेत. तर अनुक्रमे 450 आणि 320 प्रकरणे या राज्यांमध्ये नोंदवली गेली आहेत. गुरुवारी रात्री नव्या व्हेरिएंटनेग्रसित असलेले रुग्ण समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत 16,764 प्रकरणे समोर आल्यानंतर, आरोग्य मंत्रालयाच्या अद्यतनानुसार, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी 15,000 च्या वर गेली आहे.

गेल्या 24 तासांत 7,500 हून अधिक रुग्ण बरे झाले आणि 220 जण मरण पावले, एकूण बरे आणि मृतांची संख्या अनुक्रमे 34,266,363 आणि 481,080 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, सक्रिय रुग्ण संख्या सुमारे 91,361 आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT