बंगळुरुतील जयनगरमध्ये एका रॅपिडो रायडरने एका महिला प्रवाशाला थप्पड मारल्याचा एक विचित्र व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी महिलेने बाईक चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले तेव्हा हा वाद सुरु झाला. बेपर्वा गाडी चालवण्यावरुन महिलेने बाईक चालकाशी वाद घातला, त्यानंतर रॅपिडो रायडरने महिलेला इतकी जोरात थप्पड मारली की ती रस्त्यावर पडली. त्यांच्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे.
दरम्यान महिला (Women) फक्त इंग्रजीत बोलत होती तर चालक कन्नडमध्ये बोलत होता, त्यामुळे वादविवादादरम्यान परिस्थिती आणखी चिघळल्याचे बोलले जात आहे. भाडे देण्यास नकार दिल्याने चालकाने महिलेच्या थोबाडीत मारल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये रॅपिडो रायडर आणि महिला रस्त्याने जाणाऱ्या लोकांसमोर वाद घालताना दिसत आहेत, त्यांच्या वादारम्यान कोणीही हस्तक्षेप करत नाहीत. काही क्षणांनंतर रॅपिडो रायडर महिलेला जोरात थप्पड मारतो, ज्यामुळे ती जमिनीवर पडते. धक्कादायक बाब म्हणजे कोणीही महिलेला मदत करण्यासाठी आले नाही. अखेर महिलेने भाडे दिले आणि तिथून निघून गेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने हा मुद्दा वाढवू इच्छित नसल्यामुळे पोलिस (Police) तक्रार दाखल करण्यास नकार दिला. तथापि, अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
कर्नाटकात बाईक टॅक्सी सेवा आधीच कायदेशीर तपासणीच्या अधीन असताना ही घटना घडली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्देशांना मान्यता दिल्यानंतर स्पष्ट नियम तयार होईपर्यंत बाईक टॅक्सी ऑपरेशन्सवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाला प्रतिसाद म्हणून रॅपिडोने कर्नाटकमधील त्यांच्या बाईक टॅक्सी सेवा स्थगित केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.