Rap Song History, World Music Day X
देश

Rap Songs: न्यूयॉर्कचे रस्ते ते भारताच्या गल्ल्या, इंडिपॉप ते गलीबॉय; रॅप कल्चर भारतात कसे रुजले?

World Music Day: अफ्रिकन-अमेरिकन आणि कॅरिबियन वंशाच्या तरुणांनी ही शैली विकसित केली. त्यातून हिप-हॉप संस्कृती जन्माला आली, ज्यामध्ये चार मुख्य घटक होते - रॅपिंग,डीजेइंग, ब्रेकडान्सिंग आणि ग्राफिटी आर्ट.

Sameer Panditrao

रॅप सॉंगचे लोण आता भारतातील गावागावांत पोहोचले आहे. परदेशातून आलेला हा प्रकार आता भारतात तरुणाई मोठ्या प्रमाणावर ऐकते आहे आणि विशेषतः ते बनवण्याचा प्रयत्नही करत आहे.

रॅप सॉंग ही संगीताची अशी एक शैली आहे जे पारंपारिक गाण्याच्या पद्धतीत बसत नाही. या प्रकारात संगीताच्या ठेक्यावर शब्द, कथा, भावना गुंफल्या जातात. या शैलीचा उगम 1970 च्या दशकात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स भागात झाला.

मुख्यतः अफ्रिकन-अमेरिकन आणि कॅरिबियन वंशाच्या तरुणांनी ही शैली विकसित केली. त्यातून हिप-हॉप संस्कृती जन्माला आली, ज्यामध्ये चार मुख्य घटक होते - रॅपिंग,डीजेइंग, ब्रेकडान्सिंग आणि ग्राफिटी आर्ट.

रॅप साँगचा वापर सामाजिक व्यथा, व्यक्तिगत संघर्ष आणि वास्तव सांगण्यासाठी होऊ लागला आणि एक प्रभावशाली माध्यम म्हणून ते पुढे आले. पर्यावरणाची हानी, गरिबांवरील अन्याय, वर्णव्यवस्था, हिंसाचार हे महत्वाचे विषय रॅप सॉन्गसमधून हाताळले जाऊ लागले. 1979 मध्ये आलेले "Rapper's Delight" हे Sugarhill Gang चे गाणे जगभर प्रसिद्धी पावलेले पहिले रॅप साँग मानले जाते.

परदेशातून प्रसिद्ध झालेला हा प्रकार आता भारतात तरुणाई मोठ्या प्रमाणावर ऐकते आहे आणि विशेषतः ते बनवण्याचा प्रयत्नही करत आहे. सिनेमातही रॅप सॉंग्स सहज येऊ लागली आहेत.

१९९० च्या दशकाच्या आसपास रॅप सॉंग्स भारतात ऐकले जाऊ लागले. हळूहळू इंडिपॉपचा जमाना आला. पॉप संगीत इंडियन स्टाईलने बनू लागले. रॅप सॉंग्सची झलक या निमित्याने भारतीयांच्या कानावर येऊ लागली.

२००० सालानंतर अर्थव्यवस्था खुल्या होऊ लागल्या, इंटरनेट युग आले. रॅप सॉंग्सचा भारतीय चित्रपट संगीतात, अल्बम्समध्ये वापर वाढला . २०१९ साली गली बॉय सिनेमा आला आणि रॅप प्रकाराचे आकर्षण वाढले.

रॅप क्लब बनू लागले, प्रसिद्ध होऊ लागले. रॅप कॉम्पिटिशन्स वाढू लागल्या. तरुणाई स्वतः नवीन गाणे बनवण्याचा प्रयत्न करू लागली. आज यूट्यूबवरती भारतीय रॅप सॉंग ऐकायला गेलं तर लाखो गाणी आपल्याला ऐकायला मिळतील.

आज भारतात रॅप ही केवळ शैली न राहता एक आजच्या संगीतातील महत्वाचा भाग बनले आहे. राजकीय प्रचारगीते, आंदोलने, कॉलेज गॅदरिंग्ज, बर्थडे सेलिब्रेशन अशा अनेक ठिकाणी रॅप सॉंग्जस सहज ऐकू येताहेत.

मराठी, बंगाली, तामिळ अशा प्रादेशिक भाषांमध्येही रॅप सॉंग्स बनत आहेत. एकुणात काय रॅपने अमेरिकेतील रस्त्यांपासून भारतातील गल्लीपर्यंतचा प्रवास केला आणि नव्या पिढीचा आवाज बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

Goa Live News: "सरकारी नोकरी मिळाल्यावर पदाचा गैरवापर करू नका"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तरुणांना कडक इशारा

VIDEO: बाप के साये का असर होता है... रस्त्यावर खेळणी विकणाऱ्या वडिलांच्या पायाला धरुन झोपला चिमुकला; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT