Ramdev, says Brij Bhushan must be put behind bars. Dainik Gomantak
देश

Ramdev Baba in Support Of Wrestlers: रामदेवबाबा म्हणतायेत, ब्रिजभूषण यांची जागा तुरुंगातच...

Brijbhushan Sharan Singh: देशातील कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर बसणे आणि तेही कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षांवर गैरवर्तन आणि व्यभिचाराचे आरोप करणे ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

 योगगुरू रामदेव बाबा यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषदेत रामदेव बाबा कुस्तीपटुंच्या बाजूने बोलतांना म्हणाले की, कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर गैरवर्तनाचा आरोप होणे लज्जास्पद आहे.

रामदेव म्हणाले की, ब्रिजभूषण शरण सिंह यांना तात्काळ अटक करण्यात यावी, ते दररोज बहिणी आणि मुलींवर खोटी वक्तव्ये करतात. त्यांची जागा तुरुंगातच आहे.

 राजस्थानमधील भिलवाडा येथे पत्रकार परिषदेत रामदेव बाबा म्हणाले, “देशातील कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर बसणे आणि तेही कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षांवर गैरवर्तन आणि व्यभिचाराचे आरोप करणे ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. अशा लोकांना तात्काळ अटक करून तुरुंगात पाठवावे आणि ते रोज आई, बहिण, मुलींबद्दल फालतू बोलत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. एक दुष्कर्म आहे. पाप आहे."

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटू गेल्या एक महिन्यापासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. अनेक राजकीय पक्ष, संघटना आणि खेळाडू कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ सातत्याने पुढे येत आहेत.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी महिला महापंचायत

आंदोलक पैलवान आता आपल्या आंदोलनाला धार देण्याच्या प्रयत्नात आहेत. 23 मे रोजी दिल्लीतील इंडिया गेटवर कँडल मार्च काढल्यानंतर आता महिला पंचायतीची तयारी जोरात करण्यात आली आहे. ज्या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होईल, त्या दिवशी कुस्तीपटू संसदेच्या बाहेर महिला महापंचायत आयोजित करतील.

यापूर्वी ७ मे रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर खाप पंचायतही झाली होती. यामध्ये ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. खाप पंचायतीमध्ये कुस्तीपटूंच्या प्रश्नावर कारवाई करण्यासाठी सरकारला 21 मे पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता. कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

२३ एप्रिलपासून कुस्तीपटूंचे आंदोलन

या वर्षी जानेवारीमध्ये कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण, मनमानी, अपशब्द वापरणे, मानसिक छळ आणि धमक्या दिल्याचे आरोप केले होते. दुसरीकडे, ब्रिजभूषण सिंह कुस्तीपटूंचे आरोप फेटाळत आहेत.  

जानेवारीमध्ये कुस्तीपटू आंदोलन करत असताना क्रीडा मंत्रालयाने कुस्तीपटूंशी बोलून चौकशी समिती स्थापन केली होती. यानंतर पैलवानांनी आंदोलन मागे घेतले. यानंतर 23 एप्रिलपासून सरकारने दिलेले आश्वासन खोटे निघाल्याचे सांगत पैलवान पुन्हा आंदोलनाला बसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

खरी कुजबुज: गावडे पर्यायाच्‍या शोधात!

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! मूर्ती स्थापनेचे नियम आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Goa Konkani Academy: गोवा कोकणी अकादमीच्या योजनांसाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

"मी चर्चमध्ये जाणं सोडलं; माझा हरवलेला सन्मान कोण परत देणार?" निर्दोष सुटल्यानंतर माविन नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT