Delhi car bomb blast Dainik Gomantak
देश

Delhi Car Blast: '..सर्वत्र रक्त सांडले होते, फार जवळून मृत्यू पाहिला'! डोळ्यातील पाणी पुसत सांगितला दिल्ली स्फोटाचा प्रत्यक्षानुभव

Delhi Blast Eyewitness: प्रताप हे लाल किल्ल्याजवळ असलेला गाडा बंद करण्याची तयारी करत होते, तेवढ्यात जोरदार स्फोट झाला आणि सगळा परिसर हादरला. या स्फोटात प्रताप जखमी झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

दिल्ली: ‘‘लोक रस्त्यावर पडले होते; काहीजण रक्तबंबाळ झाले होते, तर काहीजण निष्प्राण झाले होते. आसपास सर्वत्र रक्त सांडलेले होते, आम्ही फार जवळून मृत्यू पाहिला’’ असा प्रत्यक्षानुभव दिल्ली स्फोटात जखमी झालेल्या राम प्रताप यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितला. या स्फोटात राम प्रताप यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. राम प्रताप हे मूळचे बिहारचे रहिवासी असून त्यांचा दिल्लीत लाल किल्ल्याजवळ खाद्यपदार्थांचा छोटासा गाडा आहे.

प्रताप हे लाल किल्ल्याजवळ असलेला गाडा बंद करण्याची तयारी करत होते, तेवढ्यात जोरदार स्फोट झाला आणि सगळा परिसर हादरला. या स्फोटात प्रताप जखमी झाले असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

‘‘सोमवारी संध्याकाळी काही ग्राहक समोर बसले होते, तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. काही क्षण माझे कान बधीर झाले होते. माझ्या अंगावर काचेचे तुकडे पडले आणि दाट धुराने डोळ्यासमोरचे काही दिसेनासे झाले.

लोक जमिनीवर पडले होते; काहीजण रक्तबंबाळ झाले होते तर काही जण निष्प्राण झाले होते. माझ्या स्वतःच्या हातालाही भरपूर जखमा झाल्या होत्या; पण त्या क्षणी मला ते जाणवलेही नाही. मी मृत्यू अगदी जवळून पाहिला,’’ असे प्रताप यांनी डोळ्यातील पाणी पुसत सांगितले.

रामप्रताप यांच्या एका नातेवाईकाने सांगितले, ‘‘स्फोट झाला तेव्हा मी तिथून काही मीटरवरच होतो. अचानक स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली माझा भाऊ दिसेनासा झाल्याने मी घाबरलो. लोक गोंधळले होते, एकमेकांना हाक मारत होते, रडत होते, आपले लोक कुठे आहेत हे शोधत होते. काही क्षणांसाठी कोण जिवंत आहे हेच कळत नव्हते.’’

त्याच सायंकाळी प्रतापच्या खानावळीपासून काही मीटर अंतरावर विजेंद्र यादव यांनी त्यांचा वॉटर टँकर लावला होता. तेवढ्यात स्फोट झाला आणि सगळे अंधारमय झाले. सहारसा (बिहार) जिल्ह्यातील यादव दिल्लीमध्ये पाणीपुरवठ्याचा छोटा व्यवसाय करतात.

त्यांच्या हाताला आणि डोक्याला या स्फोटात दुखापत झाली आहे. ‘‘स्फोटाच्या धक्क्याने मी जमिनीवर फेकला गेलो. उठलो तेव्हा अंगावरील कपडे रक्ताने माखलेले होते. रस्त्यावर मृतदेह, काचेचे आणि मांसाचे तुकडे पडलेले दिसत होते. लोक किंचाळत होते. तो आवाज अजूनही कानात घुमतोय,’’ असे यादव म्हणाले.

दहशतवादी कृत्याशी संबंध नाही

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटप्रकरणातील संशयित डॉ. उमर नबी याचा दहशतवादी कारवायांशी काहीही संबंध असू शकत नाही, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या स्फोटात वापरलेली मोटार ही डॉ. उमर नबी चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून तो पुलवामातील कोइल गावचा रहिवासी आहे.

डॉ. उमर नबी याची वहिनी मुझामिल यांनी सांगितले, ‘‘उमर लहानपणापासून अबोल स्वभावाचा होता. फार मित्र नाहीत, अभ्यास आणि कामावरच लक्ष. फरीदाबादमधील एका महाविद्यालयात तो प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी त्याचा फोन आला होता.कामात व्यग्र असून तीन दिवसांनी घरी येईन, असे त्याने सांगितले. दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असू शकत नाही. हे सर्व अविश्वसनीय आहे.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Industry: कोकणी सिनेमा बनवायचा झाल्यास 'कोटी' रुपये गोव्यातील निर्माता कोठून आणेल?

IFFI Golden Peacock Award: कुणाला मिळणार 'गोल्डन पिकॉक' अवॉर्ड? उत्सुकता शिगेला..

Karapur Sarvona: ..आणि 'तो' मीटिंगमधून पळाला! कारापूर-सर्वण पंचायतीत गोंधळ; 2 महिला पंचसदस्‍यांना शिवीगाळामुळे गदारोळ

Goa Crime: सावत्र बाप निघाला 'नराधम'! 20 महिने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ; दिली जीवे मारण्याची धमकी

Camurlim: ..परवाना नाही, तरीही झाडे तोडली! कामुर्ली ग्रामसभा तापली; सरपंचांचा FIRचा इशारा

SCROLL FOR NEXT