Rajnath Singh Dainik Gomantak
देश

भविष्यातील युद्धे आधुनिक तंत्रज्ञानावर लढणार-संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

Rajnath Singh Future Wars Statement: भविष्यातील युद्धे विमानांच्या संख्येवर नव्हे तर तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर लढली जातील, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज हवाई दलाच्या कमांडर्स परिषदेत बोलताना केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भविष्यातील युद्धे विमानांच्या संख्येवर नव्हे तर तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर लढली जातील, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज हवाई दलाच्या कमांडर्स परिषदेत बोलताना केले. आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कराच्या तिन्ही दलांनी एकत्र येत समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आधुनिक युद्धामध्ये आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारी क्षमता असणे गरजेचे असल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले की, भविष्यातील युद्धे आणि संकटांचा सामना करण्यासाठी लष्कराला त्यांच्या क्षमता, गुप्तचर आणि लढण्याच्या तयारीला सतत मजबूत करावे लागेल. शत्रूला उत्तर देण्याची संधी मिळू नये, यासाठी लष्कराला आक्रमक आणि संरक्षणात्मक अशा दोन्ही क्षमतांच्या बाबतीत अचूक राहावे लागेल.

आधुनिक युद्धे आता केवळ पारंपारिक मैदानापर्यंत मर्यादित राहिलेली नाहीत. रशिया-युक्रेन तसेच इस्त्राईल-हमास यांच्यातील युद्धात ड्रोन, क्षेपणास्त्रे व हवाई संरक्षण प्रणालीचा पुरेपूर वापर करण्यात आला. यातून तंत्रज्ञानाची युद्धातील भूमिका वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. कामिकोज ड्रोन, इलेक्ट्रॉनिक युद्धनीती आणि सायबर, अवकाश यांसारख्या नव्या क्षेत्रातील आव्हाने पार पाडण्यासाठी हवाई दलाला विशेष यंत्रणा तयार करावी लागेल तसेच रणनीती आखावी लागेल.

‘एआय’ॲपचे सादरीकरण

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान हवाई दलाने केलेल्या कामगिरीचे सिंह यांनी कौतुक केले. त्या कारवाईवेळी तिन्ही दलांनी संयुक्तपणे काम करत शत्रूला पाणी पाजल्याचे सिंह म्हणाले. हवाई दलाच्या उडान विभागाच्या ‘एआय’ सेंटर ऑफ  एक्सलन्स’द्वारा विकसित ‘एआय’ॲपप्लिकेशन सिंह यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. या ॲपची उपयोग ऑपरेशन्स, प्रशासन आणि अवकाश सुरक्षेशी संबंधित कामे स्वयंचलित आणि वेगाने करण्यासाठी केला जाणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 4th ODI: न्यूझीलंडच्या फलंदाजासोबत गुरनूर ब्रार भिडला! विकेटनंतर मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा, विराट कोहली धावत आला अन्... Watch Video

Woman Death Case: सत्तरीतील दाबे येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; विषारी फळे खाल्ल्याचा प्राथमिक अंदाज, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी

Drug Case: गोव्यातील अमलीपदार्थ प्रकरणातील फरारी संशयित राजस्थानात सापडला! पेडणे पोलिसांची पुष्करमध्ये कारवाई; 9 दिवसांची कोठडी

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला, स्फोटकांनी भरलेली गाडी सुरक्षा दलाच्या चौकीवर आदळली; 5 जवानांसह 8 जणांचा मृत्यू

Goa Deendayal Scheme: गोवा सरकारचा मोठा निर्णय! दीनदयाळ योजनेत आता दरमहा 500 रुपये जास्त; मोटारसायकल पायलट, तृतीयपंथीयांनाही लाभ

SCROLL FOR NEXT