India launch soon Theater Command operation on LAC  Dainik Gomantak
देश

चीन,पाकिस्तानला सीमेवर थोपवण्यासाठी भारताचे आता 'थिएटर कमांड'

थिएटर कमांडच्या (Theater Command) निर्मितीवर भारत सरकार वेगाने काम करत आहे.

दैनिक गोमन्तक

थिएटर कमांडच्या (Theater Command) निर्मितीवर भारत सरकार (Indian Government) वेगाने काम करत आहे. यामुळे संरक्षण सुधारणांमध्ये क्रांती होईल. असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सोमवारी पंजाब विद्यापीठात (Punjab University) राष्ट्रीय सुरक्षेवर बलरामजी दास टंडन व्याख्यानमालेच्या आपल्या ऑनलाईन भाषणात हे मत मांडले आहे. यादरम्यान ते म्हणाले की, भारताला चीनसोबतचा (China) सीमावाद (LIC) चर्चेद्वारे सोडवायचा आहे. आमचे सरकार चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकतर्फी वागू देणार नाही. सीमेच्या मुद्द्यावर आणि सन्मानाबाबत केंद्र सरकार तडजोड करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. (India launch soon Theater Command operation on LAC)

संरक्षण मंत्री म्हणाले की, जगातील कोणतीही शक्ती देशाचा मुकुट, जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळा करू शकत नाही. गरज पडल्यास भारत देशाच्या आत आणि सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर दहशतवादाविरोधात कारवाई करण्यास सक्षम आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईत बरेच बदल झाले आहेत. यामुळे लष्कराचा उत्साह वाढला आहे. सीमेवरील युद्धबंदीच्या घटना थांबल्या आहेत. ते म्हणाले की, जर पाकिस्तानमध्ये भारताशी थेट लढण्याचे धाडस नसेल, तर पाकिस्तान भारतावर हजारो घाव घालण्याच्या धोरणावर काम करत आहे.

थिएटर कमांड म्हणजे नेमके काय

तिन्ही सैन्याच्या संयुक्त कमांडला थिएटर कमांड किंवा युनिफाइड कमांड म्हणतात. योजनेनुसार, थिएटर कमांडमध्ये लष्कर, हवाई दल आणि नौदलाची युनिट्स असतील आणि हे सर्व एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हाने लक्षात घेऊन ऑपरेशनल कमांडरच्या अंतर्गत एकत्र काम करतील.

सध्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे स्वतंत्र कमांड दिल्या जातात. वाढीव आव्हान आणि सीमेवरील युद्धाच्या वेळी तीन सैन्यांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. या योजनेअंतर्गत किमान चार थिएटर कमांड स्थापन केले जातील.मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार थिएटर कमांडबाबत खूप गंभीर असल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT