CM Ashok Gehlot
CM Ashok Gehlot Dainik Gomantak
देश

Rajasthan: CM अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा, नवीन 19 जिल्हे बनणार; जाणून घ्या

Manish Jadhav

CM Ashok Gehlot: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी विधानसभेत मोठी घोषणा केली असून राज्यात 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभाग तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

गेहलोत म्हणाले की, राज्यात काही नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्या आमच्याकडे आल्या आहेत. या प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. आता आम्हाला अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे...

आता मी राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, आता या 19 नवीन जिल्ह्यांसह राजस्थान 50 जिल्ह्यांचे राज्य बनले आहे.

हे 19 नवीन जिल्हे आहेत

अनुपगड (श्रीगंगानगर)

बालोत्रा ​​(बाडमेर)

ब्यावर (अजमेर)

डीग (भरतपूर)

डिडवाना-कुचामानसिटी (नागौर)

दुदु (जयपूर)

गंगापूर शहर (सवाईमाधोपूर)

जयपूर-उत्तर

जयपूर-दक्षिण

जोधपूर पूर्व

जोधपूर पश्चिम

केकडी (अजमेर)

कोटपूतली-बेहरोड (जयपूर)

खैरथल (अलवर)

नीम का स्टेशन (सीकर)

फलोदी (जोधपूर)

सलूंबर (उदयपूर)

सांचोर (जालोर)

शाहपुरा (भिलवाडा)

याशिवाय, बांसवाडा, पाली, सीकर हे नवीन विभाग तयार करण्यात आले आहेत. आता राजस्थानमध्ये एकूण 50 नवीन जिल्हे आणि 10 विभाग आहेत. अर्थसंकल्पावरील (Budget) चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी या सर्व घोषणा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT