Chief Minister Ashok Gehlot
Chief Minister Ashok Gehlot Dainik Gomantak
देश

Udaipur: मुख्यमंत्री अशोक गेहलोत पोहोचले कन्हैयालालच्या घरी, 'नराधमांना फाशी द्या'

दैनिक गोमन्तक

Udaipur Murder Case: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत गुरुवारी उदयपूरमधील निर्घृण हत्या करण्यात आलेल्या कन्हैयालालच्या घरी पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला 51 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. कन्हैयाच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot visited Kanhaiyalal's family in Udaipur)

दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोपींना तात्काळ अटक केल्याबद्दल गेहलोत यांनी राजस्थान पोलिसांचे कौतुक केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधांची पडताळणी केल्याबद्दल कौतुक करतानाच एनआयएने या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन त्यांना कडक शिक्षा द्यावी, असेही ते म्हणाले.

दुसरीकडे, मुख्यमंत्री गेहलोत यांची भेट घेतल्यानंतर कन्हैयालाल यांचा मुलगा यश म्हणाला, ''आम्ही सुरक्षेची मागणी केली आहे. माझ्या वडिलांना सुरक्षा दिली गेली नाही परंतु आम्हाला सुरक्षा देण्यात यावी. त्यासाठी आम्हाला सरकारकडून (Government) आश्वासनही देण्यात आले आहे.'' यशने दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली आहे. तो पुढे म्हणाला की, 'दोषींना फाशीच्या शिक्षेपेक्षा काहीही कमी देऊ नये.'

कन्हैयालालचा साथीदार ईश्वरला पाच लाखांची मदत

तसेच, कन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) महाराणा भूपाल रुग्णालयात पोहोचले. इथे त्यांनी कन्हैयालालवरील हल्ल्यादरम्यान जखमी झालेल्या ईश्वर गौर यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतले. यावेळी त्यांच्यासोबत सीएस उषा शर्मा आणि डीजीपी एमएल लाथेर, एसीएस होम अभय कुमार, गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव हेही उपस्थित होते. यादरम्यान सीएम गेहलोत यांनी ईश्वर गौर यांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा केली. ईश्वर हे उदयपूरच्या सरकारी एमबी हॉस्पिटलच्या (Hospital) सुपर स्पेशालिटी बिल्डिंगमधील न्यूरो आयसीयूमध्ये आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's Live Update: 24/7 फॉर 2047! मोदींचा नवीन नारा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

SCROLL FOR NEXT