Rajasthan road construction accident Dainik Gomantak
देश

Rajasthan Jhunjhunu Accident: भीषण दुर्घटना! रस्त्याचे काम करताना 11,000 व्होल्टच्या विजेचा धक्का; 8 मजुरांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

8 Workers Killed in Rajasthan Electric Shock : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.

Sameer Amunekar

Rajasthan Jhunjhunu Road Construction Accident : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. रस्त्याच्या बांधकामाचे काम सुरू असताना ११ हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचा धक्का बसल्याने आठ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रस्त्याचे काम सुरू असताना काळाचा घाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, झुंझुनू जिल्ह्यात काही मजूर रस्त्याच्या बांधकामाचे काम करत होते. याचदरम्यान ११ हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने मोठी दुर्घटना घडली. विजेचा जोरदार धक्का बसल्याने आठ मजुरांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ६ जण गंभीर झाले आहेत.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार, पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत आणि घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले. उदयपूरवती पोलीस ठाण्याचे अधिकारी रामपाल म्हणाले, "सोमवारी सकाळी छापोली गावात रस्त्याच्या बांधकामाचे काम सुरू होते. यादरम्यान, खडी मिसळणारे एक मशीन (ग्रॅव्हेल मिक्सिंग मशीन) वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या तारेच्या संपर्कात आले. त्यातून विद्युत प्रवाह पसरला आणि कामगारांना विजेचा धक्का बसला. आठ कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: रेल्वेत 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या; सोन्याच्या एका अंगठीने उलगडलं हत्येचं गूढ, 6 तासांत आरोपी जेरबंद

Goa 39A Protest: "गोव्यातील जमीन राखण्यासाठी टीसीपी कायदा ‘39-ए’ रद्द झालाच पाहिजे"; अभिजीत दीपके यांची आक्रमक भूमिका

8th Pay Commission Salary: 8वा वेतन आयोग लागू झाल्यास पगार किती वाढणार? लेव्हल 3 ते 6 च्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे गणित

खरी कुजबुज: युतीच्या गप्पा, टेबलावर दुरावा

IND vs PAK: एकट्या तिलक वर्माची झुंज ठरली अपुरी! पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधारानं फलंदाजांना धरलं जबाबदार; म्हणाला, "...तर निकाल वेगळा असता!"

SCROLL FOR NEXT