Rahul Gandhi's account has not been suspended, according to Twitter Dainik Gomantak
देश

राहुल गांधींचे अकांउंट सस्पेंड केलेच नाही: ट्विटर

Twitter ने राहुल गांधींनी केलेली एक वादग्रस्त पोस्ट काढून टाकली होती, ज्यामध्ये राहुल गांधी दिल्लीत बलात्कार आणि हत्या झालेल्या 9 वर्षांच्या मुलीच्या कुटुंबाला भेटल्याचे पहायला मिळाले होते.

दैनिक गोमन्तक

कॉंगग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन “तात्पुरते निलंबित” केल्याचा काँग्रेसचा दावा ट्विटरने शनिवारी फेटाळून लावला. एक दिवस आधी खासदार राहुल गांधी यांनी पोस्ट केलेला फोटो काढण्यावरून वाद झाला होता. काँग्रेस पक्षाने निलंबित खाते पुन्हा सुरू करण्यासाठी "योग्य प्रक्रिया" सुरू असल्याचे घोषित केल्यानंतर, ट्विटर प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की, राहुल गांधी यांचे खाते निलंबित केलेले नसुन ते सुरुच आहे. ट्विटरने म्हटले आहे की, जेव्हा एखादे खाते निलंबित केले जाते, तेव्हा ते सोशल मिडियावरुन जागतिक पातळीवर काढून टाकले जाते.

ट्विटरने राहुल गांधींनी केलेली एक वादग्रस्त पोस्ट काढून टाकली होती, ज्यामध्ये राहुल गांधी दिल्लीत बलात्कार आणि हत्या झालेल्या 9 वर्षांच्या मुलीच्या कुटुंबाला भेटल्याचे पहायला मिळाले होते. ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार ते ट्विट नियमांचे उल्लंघन करणारे होते.

साधारणपणे, नियमांचे उल्लंघन केलेल्या एखाद्या युजरला ट्विट काढून टाकल्यानंतर 24 तास ट्विट करण्याची परवानगी नसते. लैंगिक अत्याचार पीडितांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची ओळख उघड करणे भारतात बेकायदेशीर आहे आणि तसे केल्यास ते उल्लंघन मानले जाऊ शकते.

तत्पूर्वी, काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले की, "राहुल गांधी यांचे खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे आणि ते पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT