Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: 'मुस्लिम लीग सेक्युलर पार्टी...,' राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल

Rahul Gandhi Visit America: काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Manish Jadhav

Rahul Gandhi Visit America: काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. यादरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली.

या क्रमाने त्यांनी मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून संबोधले आहे. वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात राहुल गांधींना केरळमधील मुस्लिम लीगसोबतच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला होता.

दरम्यान, मुस्लिम लीगबद्दल बोलताना राहुल म्हणाले की, 'यात धर्मनिरपेक्ष असे काहीही नाही. मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीग हा केरळचा पक्ष आहे. हा काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील UDF चा पारंपारिक सहयोगी आहे.'

दुसरीकडे, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरुन देशात राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपने मुस्लिम लीगच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, 'वायनाडमध्ये आपली स्वीकारार्हता टिकवून ठेवण्यासाठी मुस्लीम लीगला 'धर्मनिरपेक्ष पक्ष' म्हणण्याची राहुल गांधींची मजबूरी होती.'

पुढील निवडणुकीत काँग्रेस लोकांना आश्चर्यचकित करेल

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी जिंकणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी अमेरिकेत म्हटले आहे. ते म्हणाले की, "लोकांना वाटते तितके हे सोपे नाही. विरोधी पक्षांचे ऐक्य भाजपचा पराभव करेल. पुढील निवडणुकीत काँग्रेस लोकांना आश्चर्यचकित करेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Auction 2025: मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार! शेवटच्या क्षणी MI ने खेळला मोठा डाव

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

SCROLL FOR NEXT