Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Defamation Case: मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात धाव, शिक्षेच्या स्थगितीसाठी याचिका दाखल

Rahul Gandhi Defamation Case: मोदी सरनेम प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Manish Jadhav

Rahul Gandhi Defamation Case: मोदी सरनेम प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राहुल यांनी आपल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्षात गुजरात उच्च न्यायालयाने मोदी सरनेम प्रकरणात राहुल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला.

यानंतर, आता राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंतीही राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. मोदी सरनेम प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे राहुल यांना लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले होते.

वास्तविक, भाजपचे आमदार आणि गुजरात सरकारमधील माजी मंत्री पुरुनेश मोदी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल यांनी एका सभेत ललित मोदी आणि नीरव मोदी यांची नावे घेत म्हणाले होते की, 'सर्व चोरांची नावे मोदी का असतात?' राहुल यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाचा अपमान झाला आहे, असे पुरनेश मोदी म्हणाले होते. राहुल यांच्या वक्तव्याने दुखावलेल्या पुरनेश यांनी राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल यांनी SC मध्ये धाव घेतली

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यापूर्वी राहुल यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मोदी सरनेम प्रकरणी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. कोणत्याही ठोस आधाराशिवाय शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली जात असल्याचे न्यायालयाने म्हटले.

न्यायमूर्ती हेमंत पृच्छक यांनी निकाल देताना सांगितले की, 'शिक्षेवर बंदी घालण्याचा कोणताही नियम नाही. राहुल यांच्यावर 10 खटले प्रलंबित आहेत. राजकारणात शुद्धता आवश्यक असते. केंब्रिज विद्यापीठात राहुल यांनी वीर सावरकरांबद्दल वक्तव्य केले होते. यानंतर वीर सावरकरांच्या नातवाने त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयात तक्रार दाखल केली. राहुल यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास अर्जदारावर अन्याय होईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT