Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi First Reaction: खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi Disqualified: राहुल म्हणाले की, 'मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. कोणत्याही प्रकारची किंमत मोजायला मी तयार आहे.'

Manish Jadhav

Rahul Gandhi Disqualified: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावर केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने काल दोषी ठरवले. या प्रकरणी आता राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी (24 मार्च) संपुष्टात आले.

लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सुरत न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेनंतर राहुल यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातच आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे सदस्यत्व रद्द केले. या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले की, 'मी देशाच्या आवाजासाठी लढत आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.'

दरम्यान, गुरुवार, 23 मार्च रोजी सुरत न्यायालयाने (Court) राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना 15,000 रुपयांच्या दंडासह दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, राहुल गांधींना लगेच जामीन मंजूर करण्यात आला.

दुसरीकडे, लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, त्यांचा अपात्रतेचा आदेश 23 मार्चपासून लागू होईल. या निर्णयावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून कायदेशीर आणि राजकीय लढाई सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सुरत न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयावरही राहुल गांधी यांनी ट्विट केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विधानाचा हवाला देत त्यांनी ट्विट केले की, माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT