Delhi Court grants no objection for issuance of fresh passport to Congress leader Rahul Gandhi. Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Passport Row : 10 पॉइंट्समध्ये वाचा, राहुल गांधी, सुब्रह्मण्यम स्वामी आणि पासपोर्ट प्रकरण

subramanian swamy: राहुल गांधी यांनी संसदेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर केला. आता राहुल यांना अमेरिका दौऱ्यावर जायचे आहे. अशा परिस्थितीत त्यांना यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. यासाठी भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी विरोध करत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Rahul Gandhi Foreign Tour

काँग्रेस नेते राहुल गांधी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी त्यांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सामान्य पासपोर्टसाठी एनओसीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने 3 वर्षांसाठी पासपोर्ट जारी करण्याचे आदेश दिले.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल यांच्या याचिकेला विरोध केला होता. राहुल गांधी यांना 10 वर्षांसाठी सामान्य पासपोर्ट जारी करावा यासाठी कोणतेही वैध किंवा प्रभावी कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वामी यांनी न्यायालयात सांगितले की,  राहुल गांधी सतत परदेशात जातात. यामुळे तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो.  चला जाणून घेऊया राहुल गांधींना नवीन पासपोर्ट का हवा आहे आणि काय आहे हा संपूर्ण वाद?

1.डिप्लोमॅटिक पासपोर्ट म्हणजे काय?

सरकारी प्रतिनिधी, भारतीय मुत्सद्दी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट जारी केले जातात. डिप्लोमॅटिक पासपोर्टधारकांना विदेशातील दूतावासांकडून प्रवासासाठी अनेक सुविधा दिल्या जातात. तसेच, इमिग्रेशन देखील सामान्य लोकांपेक्षा खूप जलद आणि सोपे होते.

2. राहुल यांच्याकडून सामान्य पासपोर्टसाठी एनओसीची मागणी

राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर केला आहे. आता अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्यासाठी त्यांना सामान्य पासपोर्ट आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे एनओसी मागितली आहे. भारतातील सामान्य नागरिकांना सामान्य पासपोर्ट जारी केला जातो. तो निळ्या रंगाचा असतो. निळा रंग भारताचे प्रतिनिधित्व करतो. यामुळे परदेशात पासपोर्ट तपासणाऱ्यांनाही सोपे जाते.

3.राहुल यांनी याचिकेत काय म्हटले आहे?

राहुल गांधी यांच्यावतीने वकील तरन्नुम चीमा यांनी कोर्टाकडे मागणी केली की, त्यांना एनओसी देण्यात यावी, जेणेकरून त्यांना नवीन पासपोर्ट मिळू शकेल. राहुल यांच्या वतीने सांगण्यात आले की, मार्च २०२३ पासून राहुल संसदेचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर केला आहे आणि ते सामान्य पासपोर्टसाठी अर्ज करत आहेत. यामध्ये न्यायालयाकडून एनओसी आवश्यक आहे. त्याचबरोबर या प्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांचे जबाब आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

4.सुब्रह्मण्यम स्वामींची एन्ट्री कशी झाली?

खरे तर, नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत, तो खटला सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केला होता. नॅशनल हेराल्ड प्रकरणी स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध खाजगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. अशा स्थितीत न्यायालयाने स्वामी यांना राहुलच्या अर्जावर जबाब दाखल करण्यास सांगितले.

5.स्वामींनी कोर्टात काय आक्षेप घेतला?

काही मुद्द्यांच्या आधारे स्वामी यांनी 28 मे पासून राहुल गांधींच्या प्रस्तावित अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पासपोर्ट मिळवण्यासाठी न्यायालयाकडून एनओसी मागणाऱ्या अर्जाला विरोध केला आहे. यामध्ये खालील मुद्दयाचा समावेश आहे.

- राहुल गांधींना पासपोर्ट देण्यासाठी कोणताही ठोस आधार नाही.

- आधीच सुरू असलेली प्रकरणे लक्षात घेऊन राहुल गांधींना 1 वर्षापेक्षा जास्त काळ पासपोर्टसाठी एनओसी मिळू नये.

- राष्ट्रीय सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, नैतिकता आणि गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने सरकार कोणत्याही नागरिकाचा पासपोर्ट ठेवण्यास बंदी घालू शकते किंवा पासपोर्ट जप्त किंवा समन्स पाठवू शकते.

-परराष्ट्र मंत्रालयाच्या नियमांमध्ये हे स्पष्ट आहे की, जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध खटला सुरू असेल तर त्याला ठराविक कालावधीसाठीच पासपोर्ट दिला जाऊ शकतो.

6.राहुल परदेशी नागरिक असल्याचा दावा

स्वामींच्या दाव्यानुसार, राहुल गांधींनी 2003 मध्ये युनायटेड किंगडममध्ये बॅक ऑप्स नावाची कंपनी स्थापन केली आहे, ज्यामध्ये राहुल गांधींनी स्वतःला ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगितले आहे.

7.काय आहे नॅशनल हेराल्ड केस?

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये याचिका दाखल करून आरोप केला होता की काँग्रेसच्या काही नेत्यांनी असोसिएटेड जर्नंल्स लिमिटेड कंपनी चुकीच्या पद्धतीने यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतली होती. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या 2000 कोटी रुपयांच्या हेराल्ड हाऊस इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप त्यांनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला संपत्तीचा अधिकार देण्यात आला आहे.

8.2015 पासून राहुल जामिनावर

आपल्या तक्रारीत स्वामी यांनी राहुल-सोनिया आणि इतरांवर फसवणूक, कट रचणे आणि विश्वासघाताचा गुन्हेगारी आरोप केला आहे. न्यायालयाने 2015 मध्ये राहुल आणि सोनिया यांना जामीन मंजूर करताना म्हटले होते की, आरोपी राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि ते फरार होतील अशी भीती नाही.

9. सुब्रमण्यम स्वामी सध्या काय करतात?

भाजपचे माजी खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामी यांना भाजपने गेल्या टर्मनंतर राज्यसभेचे तिकिट दिले नाही. त्यामुळे ते सध्या त्याच्या वैय्यक्तीक कमांमध्ये गुतलेले असतात. ते अधून-मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजवर टीका करत असतात.

10. भारतात पासपोर्टचे किती प्रकार आहेत?

भारतात साधारणपणे चार प्रकारचे पासपोर्ट आहेत. पहिला सामान्य पासपोर्ट जो निळ्या रंगाचा असतो आणि सामान्य नागरिकांना दिला जातो.  डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरकारचे प्रतिनिधी, भारतीय मुत्सद्दी आणि सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जारी केला जातो. तो मरून रंगाचा असतो.

तिसरा पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट आहे, तो सरकारी अधिकाऱ्यांसाठी जारी केला जातो. यात अशा लोकांचा समावेश आहे जे सरकारी कामानिमित्त परदेशात जातात.

चौथा पासपोर्ट केशरी रंगाचा आहे, तो अशा व्यक्तीला जारी केला जातो, ज्याचे शिक्षण फक्त 10वीपर्यंत आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT