Karnataka Cabinet Expantion : कॉंग्रेसचे 24 आमदार आज घेणार मंत्रीपदाची शपथ

Congress in Karnataka: सिद्धरामय्या, शिवकुमार आणि AICC सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह प्रमुख केंद्रीय नेत्यांमध्ये चर्चेनंतर २४ आमदारांची नावे निश्चित करण्यात आली.
After number of meetings Congress finalized 24 names for post of Ministers
After number of meetings Congress finalized 24 names for post of MinistersDainik Gomantak
Published on
Updated on

24 MLAs to Sworn As Minister

कर्नाटकात सत्ता हाती घेतल्यानंतर एका आठवड्यानतर काँग्रेसने शुक्रवारी मंत्रीपदासाठी निवड केलेल्या 24 आमदारांची यादी जाहीर केली होती. हे 24 आमदार आज (27 मे) रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

 या शपथविधीनंतर कर्नाटक सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या 34 होईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह दहा जणांनी २० मे रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

आता आमदार एच के पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चेलुवरायस्वामी, के व्यंकटेश, एच सी महादेवप्पा, काँग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खांद्रे आणि माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडू राव हे आज दुपारी (शनिवारी) शपथ घेणार आहेत.

कायथसंद्र एन राजन्ना, शरणाबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, रामाप्पा बाळाप्पा तिम्मापूर, एस एस मल्लिकार्जुन, शिवराज संगाप्पा तंगडगी, शरणप्रकाश रुद्रप्पा पाटील, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहीम खान, डी सुधाकर, एस बोश्शूरे, एस. मधु बंगारप्पा, एम सी सुधाकर आणि बी नागेंद्र यांचाही मंत्रीमंडळात समावेश होणार आहे.

समतोल साधला

काँग्रेसच्या यादीत सहा लिंगायत आणि चार वोक्कालिगा आमदारांची नावे आहेत. तीन आमदार अनुसूचित जातीचे, दोन अनुसूचित जमातीचे आणि पाच आमदार कुरुबा, राजू, मराठा, एडिगा आणि मोगवीरा या इतर मागास समाजातील असतील. दिनेश गुंडू राव यांच्या रुपाने ब्राह्मण समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे.

 यावेळी मंत्रीमंडळात प्रादेशिक समतोलही साधण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला आहे. जुने म्हैसूर आणि कल्याण कर्नाटक प्रदेशातील प्रत्येकी सात मंत्री, कित्तूर कर्नाटक प्रदेशातील सहा आणि मध्य कर्नाटकातील दोन मंत्री आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ आणि कनिष्ठ आमदारांना योग्य सन्मान देऊन जात आणि प्रदेशनिहाय प्रतिनिधित्व देऊन समतोल साधला आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

After number of meetings Congress finalized 24 names for post of Ministers
Indore Attack: हिंदु मुलासोबत का गेलीस? म्हणत युवतीला दमदाटी; 50 जणांच्या जमावाची युगुलूला मारहाण

हे आमदार आज मंत्री म्हणून शपथ घेणार असले तरी खाते वाटप अद्याप झालेले नाही. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत असून त्यांनी पक्षनेतृत्वाशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत.

सिद्धरामय्या, शिवकुमार आणि AICC सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह प्रमुख केंद्रीय नेत्यांमध्ये चर्चेनंतर २४ आमदारांची नावे निश्चित करण्यात आली.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी पक्षप्रमुख राहुल गांधी यांनी या यादीला अंतिम मंजुरी दिली.

After number of meetings Congress finalized 24 names for post of Ministers
Go First च्या सर्व फ्लाइट्स पुन्हा 'या' तारखेपर्यंत रद्द

यापूर्वी, कर्नाटकातील दोन्ही नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेनंतर प्रथम सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. संभाव्य मंत्र्यांच्या नावावरून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मतभेद निर्माण झाले होते पण चर्चेदरम्यान ते मिटवण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, नवीन मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सर्व नेते दिल्लीहून बेंगळुरूला रवाना झाले आहेत.हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे शनिवारच्या कार्यक्रमासाठी शिवकुमार आणि सुरजेवाला यांच्यासोबत रवाना झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com