Rahul Gandhi & Sonia Gandhi
Rahul Gandhi & Sonia Gandhi Dainik Gomantak
देश

National Herald Case: नेमकं काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण, वाचा सविस्तर

दैनिक गोमन्तक

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. राहुल गांधींना 2 जून रोजी समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते परदेशात असल्याने ईडी चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. यासोबतच नॅशनल हेराल्डच्या या जुन्या प्रकरणाची पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरु झाली आहे. काय आहे काँग्रेसशी संबंधित हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...(Rahul Gandhi National Herald Case Whole Story About Sonia Gandhi And Congress)

वास्तविक, नॅशनल हेराल्ड प्रकरणात तीन प्रमुख नावे आहेत. यामध्ये असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड, यंग इंडिया लिमिटेड आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. 2012 मध्ये भाजप (BJP) नेते आणि वकील सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी आरोप केला होता की, यंग इंडिया लिमिटेडने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणाशी संबंधित फसवणूकीत काही कॉंग्रेस (Congress) नेत्यांचा संबंध आहे.

दरम्यान, यंग इंडिया लिमिटेडने नॅशनल हेराल्डच्या मालमत्तेवर "चुकीच्या" पध्दतीने कब्जा केल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. या प्रकरणात, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर असोसिएटेड जर्नल्सच्या 2,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेची केवळ 50 लाख रुपये देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

नॅशनल हेराल्ड म्हणजे काय?

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र 1938 मध्ये जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सुरु केले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील लिबरल ब्रिगेडचा इग्रंजाविरुध्दचा 'आवाज' होणे हा त्याचा उद्देश होता. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने प्रकाशित केलेले हे वृत्तपत्र स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचे मुखपत्र बनले. एजेएलने इतर दोन वृत्तपत्रेही प्रकाशित केली. 2008 मध्ये 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतल्याने पेपर बंद झाला.

असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड

एजेएल ही जवाहरलाल नेहरु यांची कल्पना होती. 1937 मध्ये नेहरुंनी इतर 5,000 स्वातंत्र्यसैनिकांच्या साहाय्याने ही कंपनी सुरु केली होती. कंपनी विशेषतः कोणत्याही एका व्यक्तीची नव्हती. 2010 मध्ये, कंपनीचे 1,057 भागधारक होते. मात्र यामध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने 2011 मध्ये त्याचे होल्डिंग्स यंग इंडियाकडे हस्तांतरण करण्यात आले. AJL ने 2008 पर्यंत इंग्रजीमध्ये नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र, उर्दूमध्ये कौमी आवाज आणि हिंदीमध्ये नवजीवन म्हणून प्रकाशित केले. 21 जानेवारी 2016 रोजी, AJL ने ही तीन दैनिके पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

यंग इंडिया लिमिटेड

यंग इंडिया लिमिटेडची स्थापना 2010 मध्ये काँग्रेस पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी यांनी संचालक म्हणून केली होती. राहुल गांधी आणि सोनिया यांच्याकडे कंपनीचे 76 टक्के शेअर्स आहेत, तर काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे उर्वरित 24 टक्के शेअर्स आहेत. कंपनीचे कोणतेही व्यावसायिक कामकाज नसल्याचे सांगितले जाते.

असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड शेअरहोल्डर्सचे शुल्क

पूर्व कायदा मंत्री शांती भूषण, अलाहाबाद आणि मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्यासह अनेक भागधारकांनी आरोप केला होता की, YIL ने AJL 'अधिग्रहित' केले तेव्हा आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नव्हती. नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपी सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांची स्वामींच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात नावे आहेत.

दुसरीकडे, 2014 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात काही मनी लाँड्रिंग आहे का हे पाहण्यासाठी तपास सुरु केला आहे. 18 सप्टेंबर 2015 रोजी, अंमलबजावणी संचालनालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु केल्याची नोंद करण्यात आली.

नॅशनल हेराल्ड प्रकरण: आतापर्यंतची कार्यवाही

सोनिया आणि राहुल गांधी यांना 19 डिसेंबर 2015 रोजी ट्रायल कोर्टाने या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. 2016 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील पाचही आरोपींना (सोनिया, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे) वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून सूट दिली होती, त्यांच्याविरुद्धची कार्यवाही रद्द करण्यास नकारही दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT