Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

ताबडतोब टाकी भरुन घ्या, 'इलेक्शन ऑफर' संपत चाललीयं

विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी ट्विट करत म्हटले की, 'जनतेने त्यांच्या गाडीची टाकी भरुन घ्यावी, कारण मोदी सरकारची 'इलेक्शन ऑफर' लवकरच संपणार आहे.' उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (Assembly Elections) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेल्या नसून निवडणुका संपल्यानंतर त्या वाढतील, असा दावा काँग्रेसने केला आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवल्यास लिटरमागे 10 ते 12 रुपयांनी वाढ होऊ शकते, असेही अनेक अहवालांमधून सांगण्यात आले आहे. (Rahul Gandhi has criticized the central government)

दरम्यान, ICICI सिक्युरिटीजने अहवालात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती दोन महिन्यांत वाढल्यामुळे, तेल कंपन्यांना खर्चाची पूर्तता करण्यासाठी 16 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी इंधनाच्या किमती 12.1 प्रति लिटरने वाढवाव्या लागतील. तेल कंपन्यांच्या मार्जिनचाही विचार केल्यास लिटरमागे 15.1 रुपये दरवाढ करावी लागू शकते. गुरुवारी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 120 डॉलरचा टप्पा ओलांडला होता, जो गेल्या नऊ वर्षांतील सर्वोच्च आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT