Rahul Gandhi Video Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Video: BJP, RSS विरोधात कसे लढणार? राहुल गांधींचा लाइव्ह डेमो, भाजपने उडवली खिल्ली

राहूल गांधीच्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Pramod Yadav

काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात पोहोचली आहे. दरम्यान, यात्रेतील राहुल गांधींचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी संवाद साधत आहेत. यात जर आरएसएसने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही त्याला कसे प्रत्युत्तर देणार? त्याच्याशी लढायचे कसे? याचा डेमो कार्यकर्त्यांना देत आहेत.

भारत जोडो यात्रेच्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, जो तुमच्याशी लढतोय त्याची ताकद तुम्ही कशी बनवू शकता. जेव्हा RSS तुमच्यावर हल्ला करतो तेव्हा ते आपली सर्व शक्ती तुमच्यावर लादत असतात. त्यांच्या हातातून ती ऊर्जा घेऊन तुम्ही ती तुमची कशी बनवू शकता? याचा प्रत्यक्ष डेमो देताना राहूल गांधी दिसत आहेत. यात ते त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील सामिल करून घेतात.

दरम्यान, या व्हिडीओवरून आता सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते आणि नेते राहूल गांधी यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. भाजप नेते ताजिन्दर पाल बग्गा यांनी राहूल गांधी यांचा हा व्हिडिओ ट्विट करत स्माईल इमोजी वापरली आहे.

भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालविय यांनी देखील राहूल गांधी यांचा हा व्हिडिओ ट्विट करत राहूल गांधीवर टीका केली आहे. ओ राहूल! आम्ही तुझ्या शिवाय काय करणार? या शब्दात खोचक टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

अग्रलेख: राजकारणाचे ‘घरपण’

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT