Rahul Gandhi Criticized Central Government  Dainik Gomantak
देश

'मुझ में भी थोडी काश्मिरीयत है'; श्रीनगरमधुन राहुल गांधींचे वक्तव्य

काश्मीरचा मुद्दा संसदेत मांडायचा होता पण मला बोलण्याची संधी दिली नाही, असे म्हणत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केंद्र सरकारवर निशाना साधला.

दैनिक गोमन्तक

2019 मध्ये जम्मू -काश्मीरचा (Jammu and Kashmir) विशेष दर्जा संपल्यानंतर प्रथमच श्रीनगरमध्ये आलेले कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जम्मू -काश्मीर राज्याचा दर्जा बहाल करण्याची आणि मुक्त आणि निष्पक्ष विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. विरोधकांचा आवाज दडपल्याबद्दलही राहुल यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, जेव्हाही आम्ही पेगासस आणि जम्मू -काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा आमचा आवाज बंद झाला. (Rahul Gandhi criticizes the central government from Srinagar)

काश्मीरच्या लोकांना भावनिक साद घालत जोडत राहुल म्हणाले, 'माझ्यातही थोडी काश्मिरीयत आहे.' राहुल गांधी पुढे म्हणाले, 'गुलाम नबी आझादजींनी मला काश्मीरचा मुद्दा संसदेत मांडण्यास सांगितले होते पण मला तुम्हाला सांगायचे आहे की, आम्हाला त्याबद्दल बोलण्याची परवानगी दिली नाही. पेगासस, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत जे मला मांडायचे होते पण बोलण्याची संधी दिली गेली नाही.’

यावेळी बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'आज ही परिस्थिती केवळ जम्मू -काश्मीरबद्दल नाही तर सर्व संस्थांबद्दल आहे. न्यायव्यवस्थेप्रमाणेच राज्यसभा आणि लोकसभेवरही हल्ले होत आहेत. मीडिया सत्य उघड करत नाही..त्यांना दडपले जाते आहे, धमक्या दिल्या जाता आहेत. त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यांना भीती वाटते की, जर त्यांनी वस्तुस्थितीची माहिती दिली तर त्यांना नोकरी गमवावी लागेल. जम्मू आणि काश्मीर सध्या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'मॅन ऑफ द मोमेंट'! ईशान किशनचा मोठा शॉट फसला, मार्को यान्सननं बाऊंड्री लाईनवर घेतला भन्नाट कॅच; चाहतेही अवाक

सोन्याच्या किमतीत तेजीचं 'महावादळ', दीड लाखांचा टप्पा फत्ते! गुंतवणूकदारांची चांदी, तर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Horoscope April 2026: एप्रिल महिना 'या' राशीसाठी ठरणार 'लकी'! अविवाहितांसाठी सनई-चौघड्यांचे शुभ संकेत; जाणून घ्या ग्रहांची बदलती स्थिती

IPL 2026: "वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर प्रतिस्पर्धी ढेर, राजस्थान फायनलमध्ये जाणारच", दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

IPL 2026 Points Table: मुंबई-चेन्नई तळाला! पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा दबदबा, आरसीबी बॅकफूटवर; पंजाब किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण

SCROLL FOR NEXT