Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

''सीमेवरील घुसखोरीबाबत पंतप्रधानांचे मौन देशासाठी घातक''

राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

दैनिक गोमन्तक

भारतात चीनच्या वाढत्या घुसखोरीचा मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. भारतीय हद्दीत चीनची वाढती घुसखोरी आणि पंतप्रधानांचे मौन हे देशासाठी घातक असल्याचे गांधी यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करून पंतप्रधानांना चीनची भीती वाटते, ते जनतेपासून सत्य लपवतात, असे म्हटले आहे.

गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, पंतप्रधानांवर लष्कराचे मनोधैर्य खच्ची करत देशाच्या सुरक्षेशी खेळल्याचा आरोपही केला आहे. तसेच भारतीय हद्दीत चिनी घुसखोरी आणि पंतप्रधान या विषयावर कोणतेही वक्तव्य करत नसल्याने काँग्रेस नेते त्यांच्यावर हल्ले करत आहेत. तसेच सर्व काही माहीत असूनही आपली प्रतिमा वाचवण्यासाठी सरकार गप्प आहे. असा ही टोला त्यांनी लगावला आहे.

LAC जवळ चीनकडून युद्धे यामध्ये हवाई संरक्षण शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची माहितीही मिळाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चीनचे एक विमान LAC वर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांच्या पोझिशनच्या अगदी जवळ आले होते. रडारवर चिनी विमाने दिसताच भारतीय हवाई दल सक्रिय झाले. हवाई दलाने ही घुसखोरी मानली आणि चिनी विमाने पाडण्यासाठी आपली क्षेपणास्त्रे सक्रिय केली. मात्र, भारताच्या इशाऱ्यानंतर चीनचे विमान माघारी गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT