Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

''तेलंगणात मुख्यमंत्री नाही तर 'राजा' आहे,'' राहुल गांधींचा हल्लाबोल

तेलंगणातील वारंगळमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींनी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( K. Chandrasekhar Rao) यांच्यावर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

तेलंगणातील वारंगळमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींनी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( K. Chandrasekhar Rao) यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राहुल म्हणाले, “आज तेलंगणात मुख्यमंत्री आहे असे म्हटले जाते, परंतु हा मुख्यमंत्री नसून 'राजा' आहे. राजा आणि मुख्यमंत्री यात काय फरक आहे? मुख्यमंत्री ( Telangana CM) जनतेचा आवाज ऐकतो आणि राजा जनतेचा आवाज दाबतो. तुमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा (Farmers) आवाज ऐकत नाहीत. तेलंगणातील (Telangana) शेतकरी आजही म्हणत आहे की, आमच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. अद्याप पिक कर्ज माफ झालेले नाही.'' (Rahul Gandhi criticized Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao)

राहुल गांधी पुढे म्हणाले, ''इथे काँग्रेसचे सरकार बनताच 2 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि योग्य तो MSP ही दिला जाईल. आज इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे, ही जबाबदारी कोणाची? तुम्ही किती सामर्थ्यवान आहात किंवा किती मोठे आहात हे महत्त्वाचे नाही. तुम्ही गरीब, शेतकऱ्यांसोबत नसाल तर तुम्हाला काँग्रेसचे तिकीट मिळणार नाही.''

मुख्यमंत्री पैसे चोरु शकतात - राहुल

राहुल गांधी पुढे म्हणाले, ''भाजपला (BJP) माहित आहे की, काँग्रेस त्यांच्याशी कधीही तडजोड करणार नाही, त्यामुळे त्यांना तेलंगणात टीआरएसचे सरकार हवे आहे. याचा परिणाम म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री हवा तेवढा पैसा चोरु शकतात. भाजप सरकार (Central Government) त्यांच्या पाठीमागे ईडीचा ससेमिरा लावणार नाही.''

दुसरीकडे, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांनी राहुल गांधींच्या उस्मानिया विद्यापीठाच्या भेटीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ''राहुल कधीच तेलंगणाच्या बाजूने बोलले नाहीत, मग ते वारंगळ आणि उस्मानिया विद्यापीठात का जात आहेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

SCROLL FOR NEXT