Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

इंधन दरवाढीवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकार निशाना

दिल्लीत सीएनजी (CNG) गॅस पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ कंपनीने सीएनजी चे दर प्रति किलो 90 पैशाने तर, घरगुती गॅस 1.25 रुपयांनी वाढवले आहेत.

दैनिक गोमन्तक

सीएनजी दर वाढीसंदर्भात कॉंग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारवर (Central Government) टिकास्त्र सोडताना राहुल गांधी म्हणाले की, महागाई वाढतच असुन 'अच्छे दिन' परवडत नाहिये. यावेळी राहुल गांधींनी “महागाईचा विकास सुरु आहे.” असे ट्विट केले आहे. तसेच, “अच्छे दिन देश पर भारी प्रधान मंत्री की बस मित्रो को जबाबदारी” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाना साधला आहे. (Rahul Gandhi Criticised Central Government)

दिल्लीत सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ कंपनीने सीएनजी चे दर प्रति किलो 90 पैशाने तर, घरगुती गॅस 1.25 रुपयांनी वाढवले आहेत. त्यावरुन राहुल गांधींनी केंद्र सरकारला धारेवर धरल्याचे पहायला मिळते आहे.

देशातील 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. यामध्ये तेलंगणा, लडाख, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम, दिल्ली आणि पश्चिम बंगाल अशा राज्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सीएनजी, पीएनजी आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम मध्यमवर्गीय लोकांच्या अर्थसंकल्पावर होणार आहे. देशभरातील महागाईच्या मुद्यासंदर्भात काँग्रेस सर्व राज्यात 17 जुलैपर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT