Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Viral Video Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Viral Video : राहुल गांधींच्या 'Bharat Jodo' यात्रेत राष्ट्रगीताच्या नावावर वाजले दुसरेच काही, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Viral Video : सोशल मीडियावर काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये व्यस्त आहेत. ते देशभरात पायी यात्रा करत लोकांना आपल्याशी जोडत आहेत. यावेळी अनेक काँग्रेसचे नेते, कामगार आणि समाजातील इतर लोकही या यात्रेशी जोडले जात आहेत.

या यात्रेबाबत अनेक चर्चा आणि वादही सध्या सुरू आहेत. सध्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेदरम्यान असे काही घडले आहे की सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra)

सोशल मीडियावर काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली जात आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यात्रेच्या एका ठिकाणी स्टेजवर उभे आहेत. यावेळी राष्ट्रगीत वाजवण्यासाठी राहुल गांधी यांनी घोषणा केली. यानंतर इतर सर्व कामगारही अलर्ट मोडमध्ये उभे राहिले.

मात्र तितक्यात एक गफलत झाली आणि राष्ट्रगीताऐवजी काहीतरी वेगळंच वाजायला सुरुवात झाली. काही सेकंदांनंतर राहुल गांधींनी निर्देश केला आणि ते वेगळे गीत थांबवले गेले. या घटनेचा video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राहुल गांधींवर अनेकजण जोक्स करत आहेत.

येथे व्हिडिओ पाहा :

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. काहीजण त्याला नेपाळचे राष्ट्रगीत असल्याचे सांगत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना 'फॅक्ट्स' नावाच्या ट्विटर युजरने मजेशीर स्वरात लिहिले की, 'हे नेपाळचे राष्ट्रगीत आहे. राहुल गांधी खऱ्या अर्थाने अखंड भारत जोडो यात्रेवर आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT