Rahul Gandhi attacks on Prime minister Narendra Modi on repel the farm bills Dainik Gomantak
देश

'कायदे रद्द केलेत पण मोदीजी प्रायश्चित्त कसं करणार?', राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र

राहुल गांधींनी ट्विट करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

मागे घेण्यात आलेल्या कृषी कायद्यावरून (Farm Laws) काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. कृषी विरोधी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) माफी मागितली आहे, पण संसदेत ते प्रायश्चित कसे करणार, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधींनी ट्विट करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi attacks on Prime minister Narendra Modi on repel the farm bills)

राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "जेव्हा पंतप्रधानांनी शेतीविरोधी कायदा बनवल्याबद्दल माफी मागितली, तर संसदेत सांगा तुम्ही याबाबत प्रायश्चित्त कसे करणार? लखीमपूर प्रकरणाचे मंत्री कधी बडतर्फ करणार ? शहीद शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार? सत्याग्रहींवरील खोटे खटले कधी परत येणार? एमएसपीवर कायदा कधी? त्याशिवाय माफी अपूर्णच! असा हल्लाबोल करत त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटना आणि विरोधक सरकारकडे सातत्याने करत आहेत. मात्र वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, याचा आकडा नाही, त्यामुळे भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही, असे केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी संसदेत सांगितले होते.

तर दुसरीकडे काल पासून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये जोरदार वादावादीही झालेली पाहायला मिळाली . एकीकडे विरोधक केंद्रावर कोरोनाबाबत बेफिकीर असल्याचा आरोप करत असतानाच, भाजप खासदारांनी केंद्रातील मोदी सरकारच्या साथीच्या आणि लसीकरणातील उत्कृष्ट कामगिरीचा पाढा वाचला. या चर्चेवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज उत्तर देणार आहेत.

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच संसदेत या विषयावर चर्चा होत असल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि लसींच्या उपलब्धतेबाबत केंद्रावर भाजपशासित राज्ये आणि बिगर भाजप राज्यांमध्ये भेदभाव केल्याचा आरोप देखील केला आहे. याशिवाय पीएम केअर फंडाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. सीपीआय खासदार एएम आरिफ म्हणाले की, पीएम केअर्स फंडात किती पैसे जमा झाले हे कोणालाही माहिती नाही. ते म्हणाले की, साथीच्या रोगात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकांना स्मशानभूमीतही जागा मिळाली नाही. लोकांचे मृतदेह नद्यांमध्ये फेकले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT