Rahul Gandhi attacks on Prime Minister Narendra Modi on Lakhimpur Kheri Issue 

 

Dainik Gomantak

देश

"मोदी जी, फिर से माफी मांगने का टाइम आया है …" राहुल गांधींचे टीकास्त्र

या साऱ्या प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे

दैनिक गोमन्तक

लखीमपूर-खैरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Case) प्रकरणातील विशेष तपास पथकाच्या (SIT) अहवालावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत तहकूब नोटीस दिली होती. मात्र, राहुल गांधी सभागृहात या विषयावर बोलू शकण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. नोटीसमध्ये राहुल गांधी यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब करून एसआयटीच्या अहवालावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती. लखीमपूर खेरी मुद्द्यावर संसदेत (Parliament) झालेल्या चर्चेशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना,संसदेत सरकार आम्हाला चर्चा करू देत नाही. त्यांचे मंत्री यात सहभागी आहेत, यावर चर्चा व्हायला हवी, असे आम्ही म्हटले. मात्र ते चर्चेला परवानगी देत ​​नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. (Rahul Gandhi attacks on Prime Minister Narendra Modi on Lakhimpur Kheri Issue )

विशेष म्हणजे लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंतचा तपास आणि पुराव्यांच्या आधारे दावा केला आहे की, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा 'टेनी' आणि त्यांच्या साथीदारांनी जाणूनबुजून, तसेच - नियोजित रित्या हे सार केलं आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दिलेल्या अर्जात एसआयटीचे मुख्य तपास निरीक्षक विद्याराम दिवाकर यांनी आरोपींवर वरील आरोपांच्या कलमांखाली खटला चालवण्याची विनंती केली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Midhra) मोनू आणि त्यांच्या 13 सहकाऱ्यांवर 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीवे मारल्याचा आरोप आहे.

आता या साऱ्या प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे ट्विट करत त्यांनी,"मोदी जी, फिर से माफी मांगने का टाइम आया है … पण आधी आरोपीच्या वडलांना पदावरून हटवा सत्य समोर आहे!'अशी टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT