Pushkar Singh Dhami Dainik Gomantak
देश

पुष्कर सिंह धामींनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

पुष्कर धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान मोदीही उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

पुष्कर सिंह धामी यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. डेहराडूनमधील परेड ग्राउंडवर बुधवारी झालेल्या भव्य शपथविधी समारंभात राज्यपाल लेफ्टनंट जनरल ( Retired) गुरमीत सिंग यांनी धामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Prime Minister Narendra Modi) अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख केंद्रीय मंत्र्यांमध्ये अमित शहा आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे प्रमुख नेते होते. यूपीचे नवनियुक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. (Pushkar Singh Dhami takes oath as Uttarakhand chief minister)

दरम्यान, धामी यांच्यासह आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यापैकी सतपाल महाराज, सुबोध उनियाल, धनसिंग रावत, रेखा आर्य आणि गणेश जोशी यांनी सलग दुसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. चंदन राम दास, सौरभ बहुगुणा आणि प्रेमचंद्र अग्रवाल यांना पहिल्यांदाच मंत्री करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वी पुष्कर धामी यांनी आज डेहराडूनमधील टपकेश्वर मंदिरात प्रार्थना केली. सोमवारी संध्याकाळी बलबीर रोडवरील पक्षाच्या राज्य मुख्यालयात निरीक्षक आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सहनिरीक्षक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. बैठकीत धामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

शिवाय, नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने उत्तराखंडमधील 70 पैकी 47 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा दोनतृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवून भाजप सत्तेवर आला. मात्र "उत्तराखंड फिर मांगे, मोदी-धामी की सरकार" 'चा नारा देत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या धामींना त्यांच्याच पारंपरिक खतिमा जागेवरुन पराभूत व्हावे लागले. त्यामुळे नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांच्या नावावर नव्याने मंथन करावे लागले. विशेष म्हणजे त्यास तब्बल 11 दिवसांचा कालावधी लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT