Punjab ministers Viral video  Dainik Gomantak
देश

Punjab Flood: पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पंजाब मंत्र्यांच्या 'गोवा' ट्रीपबाबत गप्पा; व्हिडिओ व्हायरल, विरोधकांची टीका

Punjab Flood Viral Video: समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हरभजन सिंग ईटीओ यांच्यासोबत बरिंदर कुमार गोयल आणि ललित भुल्लर दिसत आहेत.

Pramod Yadav

पंजाब: मुसळधार पावसामुळे पंजाबमधील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये पंजाब सरकारचे तीन मंत्री दिसत आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे तिघेही पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी गेले होते, परंतु ते त्यांच्या गोवा ट्रिप आणि तिथल्या क्रूझ ट्रिपबद्दल बोलत होते.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिन्ही मंत्र्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनीही हा मुद्दा उपस्थित करत आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला.

सरकारमधील कोणत्याही नेत्याने या वादावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हरभजन सिंग ईटीओ यांच्यासोबत बरिंदर कुमार गोयल आणि ललित भुल्लर दिसत आहेत.

विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. "पूरग्रस्त पंजाबमधील लोक अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी भीक मागत आहेत, परंतु आप सरकारच्या या मंत्र्यांना त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करण्याची संधी मिळालीय, हे लोक क्रूझ, स्वीडन आणि गोवा ट्रीपबद्दल बोलत आहेत, हा मदत दौरा आहे का?"

पंजाबी अशा लोकांना कधीही माफ करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली आहे. तर, क्रूझचा आनंद घेतला जात आहे, तोही जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना वेदना देऊन, असे मत दुसऱ्या एका व्यक्तीने मांडले.

दरम्यान, सध्या पंजाबच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब पोलिस, एनडीआरएफ यासह भारतीय सैन्याकडून देखील पूरग्रस्त भागात मदतकार्य केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: उंदीर मामाने पळवला गणपती बाप्पाचा मोदक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; फोंड्यातील मजेशीर घटनेने वेधले लक्ष

Goa liquor Smuggling: जीव धोक्यात, तिजोरीची लूट; दारु तस्करीबाबत विजय सरदेसाईंचे वित्त सचिवांना पत्र

Viral Video: हरभजन सिंह आणि श्रीसंतचा 'तो' वाद पुन्हा चर्चेत, अखेर 17 वर्षांनी व्हिडिओ आला समोर; ललित मोदींनी केला मोठा खुलासा

Asia Cup 2025: BCCI चा मोठा निर्णय! जैसवाल, वॉशिंग्टनसह 5 जणांना झटका; दुबईला न नेण्याचा घेतला निर्णय

Mini Goa: प्रसिद्ध पर्यटनस्थळ मिनी गोवा येथे चार शालेय मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला

SCROLL FOR NEXT