Aap Leader Jarmal Singh Murder Dainik Gomantak
देश

लग्नात रक्ताचा सडा! 'आप' नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, लग्नमंडपात शिरुन दोन अज्ञातांनी झाडल्या गोळ्या; जेवणाच्या पंगतीत मृत्यूचा थरार

Aap Leader Jarmal Singh Murder: पंजाबमधील अमृतसरमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली.

Manish Jadhav

Aap Leader Jarmal Singh Murder: पंजाबमधील अमृतसरमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली. अमृतसरमधील वेरका बायपासवरील एका नामांकित रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या लग्नसोहळ्याचे रुपांतर काही क्षणातच शोकांतिकेत झाले. आम आदमी पार्टीचे स्थानिक नेते जर्मल सिंह यांची दोन अज्ञात हल्लेखोरांनी भर लग्नात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी अमृतसरच्या वेरका बायपासवरील 'मॅरीगोल्ड' रिसॉर्टमध्ये एका लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी दीनानगरहून वरात आली होती. आम आदमी पार्टीचे वल्टोहा येथील सरपंच जर्मल सिंह हे मुलीच्या बाजूने या लग्नाला उपस्थित होते. लग्न आनंदात सुरु असतानाच अचानक दोन तरुण रिसॉर्टमध्ये घुसले. त्यांनी थेट जर्मल सिंह यांना लक्ष्य केले आणि त्यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. गोळी लागताच जर्मल सिंह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला थरार

दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे लग्नकार्यात उपस्थित असलेल्या पाहुण्यांची एकच धांदल उडाली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "सगळे काही सुरळीत सुरु होते, लोक जेवणाचा आस्वाद घेत होते. तेवढ्यात बाहेरुन दोन तरुण आले आणि त्यांनी काही समजण्याच्या आत जर्मल सिंह यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखून गोळ्या झाडल्या. केवळ दोन गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यानंतर हल्लेखोर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले."

जर्मल सिंह यांच्यावर आधीही झाले हल्ले

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीसीपी जगजीत वालिया यांनी सांगितले की, जर्मल सिंह हे तरनतारन जिल्ह्यातील वल्टोहा येथील रहिवासी होते. पोलीस तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे जर्मल सिंह यांच्यावर यापूर्वीही तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले होते. जुन्या वैमनस्यातून किंवा राजकीय वादातून ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांची कारवाई आणि तपास

डीसीपी वालिया यांनी आश्वासन दिले आहे की, पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. "आम्ही प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. रिसॉर्टमधील सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरुन आरोपींचा माग घेतला जात आहे. जो कोणी या कृत्यात दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले. जर्मल सिंह हे आम आदमी पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आणि सरपंच असल्याने या हत्येमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रिसॉर्ट आणि परिसरात पोलिसांचा (Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: दक्षिण गोव्यात भाडेकरू आणि पर्यटकांची पोलीस पडताळणी अनिवार्य

"ही राजकीय नाही, गोवा वाचवण्‍याची चळवळ"! निवृत्त न्‍या. फर्दिन रिबेलोंची हाक; वाचा घोषणापत्र आणि महत्वाचे मुद्दे..

Goa Road Projects: गोव्‍यासाठी 7076 कोटींच्‍या रस्त्यांचा प्रस्‍ताव गडकरींना सादर! मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

Chimbel: 'प्रकल्प उभारा, पण संवेदनशील चिंबलमध्ये नको'! मुख्यमंत्र्यांशी चर्चेस तयार, शिरोडकरांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT