PM Modi, Charanjit Singh Channi AND Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

...म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी राहुल गांधींच्या सभेला मुकले

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी पंजाबमध्ये (Punjab) 'नो फ्लाइंग झोन' घोषित करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी होशियारपूरमध्ये सोमवारी आयोजित राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. (Narendra Modi Rahul Gandhi)

चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करू दिले नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी पंजाबमध्ये (Punjab) 'नो फ्लाइंग झोन' घोषित करण्यात आला आहे. परिणामी चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डानाची परवानगी देण्यात आली नाही. यावर भाष्य करताना चन्नी म्हणाले, राजकारणामुळे माझे हेलिकॉप्टर उडू दिले जात नाही. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे नो-फ्लाय झोन घोषित करून मला होशियारपूरला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. होशियारपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला मी उपस्थित राहू शकलो नाही.

कॉंग्रेसचे (Congress) सुनील जाखड यांनी होशियारपूरच्या सभेत आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री येथे येणार होते, मात्र त्यांची परवानगी रद्द करण्यात आली. निवडणूक आयोगाने याची दखल सुद्धा घेतली नाही.

5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंजाबमधील फिरोजपूरला भेट दिली होती. मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांना रस्त्याने जावे लागले, मात्र यावेळी हुसैनीवालापासून 30 किमी अंतरावर आंदोलकांनी मोदींचा रस्ता अडवला. त्यामुळे मोदींचा ताफा सुमारे 20 मिनिटे एका जागी थांबला होता. त्यानंतर पंजाबमधील राजकारण चांगलेच तापले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT